चौकातल्या पोराला फिल्मफेअर! देवेंद्रसाठी प्रविण तरडेंची खास पोस्ट

19 Apr 2024 15:44:44
अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा खास मित्र देवेंद्र गायकवाड यांना पहिल्याच चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२४ मिळाला.
 

pravin  
 
मुंबई : ‘चौक’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवणाऱ्या देवेंद्र गायकवाड यांना फिल्मफेअर पुरस्कार २०२४ मिळाला आहे. पहिल्याच दिग्दर्शकीय पदार्पणात पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा मित्र आणि लेखक-दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे (Pravin tarade) यांनी मित्रासाठी खास पोस्ट केली आहे.
 
देवेंद्र गायकवाड यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतर प्रविण तरडेंनी मित्रासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. "चौकातल्या पोराला फिल्मफेअर... आज दयाचे वडील हवे होते. लहान मुला सारखे नाचले असते. पुरुषोत्तम करंडकच्या बक्षिस समारंभापासून प्रत्येक ठिकाणी त्याचं कौतुक करायला यायचे. मला गमतीने म्हणायचे, ये तरडे अरे हा नुसतं तुझ्याबरोबर फिरणार का तुझ्यासारखी बक्षिसं पण घेणार? बघितलं का काका जे अजून मलाही नाही मिळालं ते बक्षिस आज तुमच्या मुलानी घेऊन दाखवलं...दया तुझा अभिमान आहे आम्हाला", असं प्रविण तरडेंनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
 

pravin  
 
देवेंद्र गायकवाड यांनी 'चौक' चित्रपटातून दिग्दर्शनाला सुरुवात केली होती. हा चित्रपट २ जून २०२३ला प्रदर्शित झाला होता. यात संस्कृती बालगुडे, किरण गायकवाड, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, प्रविण तरडे, स्नेहल तरडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
 
 
 
Powered By Sangraha 9.0