रोहिंग्या दहशतवाद्यांनी १६०० हिंदूंना ठेवले ओलिस; २०१७ मध्ये झालेल्या नरसंहाराच्या पुनरावृत्तीची भीती

17 Apr 2024 11:55:59
 Arakan Army
 
नाएप्यीडॉ : रोहिंग्यांनी म्यानमारच्या अराकान प्रांतात १६०० हून अधिक हिंदू आणि १२० बौद्ध समुदायाच्या लोकांना ओलीस ठेवले आहे. ही घटना म्यानमारच्या अराकान प्रांतातील बुथिदुआंग शहरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या परिसरात अराजकता आणि अस्थिरतेचे वातावरण आहे. आता सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की हे सर्व काम लष्कर स्वतः करत आहे.
 
रोहिंग्यांनी २०१७ मध्ये म्यानमारमध्ये मोठ्या संख्येने हिंदू आणि बौद्धांची हत्या केली होती. आता पुन्हा एकदा इस्लामी दहशतवादी राखीन राज्यात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत. वृत्तानुसार, म्यानमारच्या लष्कराने इस्लामिक कट्टरपंथीयांना देशातील स्थानिक समुदायांमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम दिले आहे. धर्माच्या आधारे नरसंहाराचा कट रचला जात आहे.
 
 हे वाचलंत का? - "शाळेत नमाज पठण करायचे असल्यास शाळा सोडा"; धार्मिक प्रार्थनेसाठी परवानगी मागणारी याचिका कोर्टाने फेटाळली
 
रोहिंग्यांनी १६०० हून अधिक हिंदू आणि १२० हून अधिक बौद्धांना ओलीस ठेवले आहे. आता त्यांच्या सुटकेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिसरात धार्मिक व जातीय दंगली होत असल्याने लोकांना जीव वाचवण्यासाठी या भागातून स्थलांतर करावे लागत आहे. गुरुवार, दि. ११ एप्रिल २०२४ दोन तरुणांचे मृतदेह सापडले, त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
 
म्यानमारचे सैन्य नोव्हेंबर २०२३ पासून अराकान आर्मीशी लढत आहे आणि त्यानंतर अशा प्रकारची ही पहिलीच घटना होती. म्यानमार आर्मीने अराकान रोहिंग्या सॅल्व्हेशन आर्मी (एआरएसए) आणि अराकान रोहिंग्या आर्मी (एआरए) यांना अराकान आर्मी (एए) विरुद्ध लढण्यासाठी शस्त्रे आणि लष्करी प्रशिक्षण दिले आहे. रोहिंग्या दहशतवादी केवळ घरेच लुटत नाहीत तर लोकांचे अपहरण करून त्यांची घरे जाळत आहेत.
 
 हे वाचलंत का? -  अल्पसंख्यांकांच्या मॉब लिंचिंगबद्दल याचिका! कोर्ट म्हणाले, "मग कन्हैय्यालाल सोबत काय झालं होतं?"
 
म्यानमारच्या विद्रोही गटांनी रोहिंग्या संघटनांना धार्मिक विभाजनाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे आणि जात किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव न करता सर्व नागरिकांचे रक्षण करण्यासाठी ते वचनबद्ध असल्याचेही सांगितले आहे. २०१७ मध्ये राखीनमध्ये १०० हून अधिक हिंदूंची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यात अनेक महिला आणि लहान मुले होती. म्यानमारच्या लष्कराने रोहिंग्या लोकसंख्येने एएच्या विरोधात आंदोलनही केले होते. आता संधी मिळताच हेच रोहिंग्या हिंदू आणि बौद्धांवर अत्याचार करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0