हैदराबाद नरसंहारावर बेतलेला ‘रजाकार’ मराठी आणि हिंदीतही होणार प्रदर्शित

17 Apr 2024 16:10:27
Razakar: The Silent Genocide of Hyderabad चित्रपट २६ एप्रिल २०२४ रोजी देशभरात सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
 

razakar  
 
मुंबई : वास्तववादी चित्रपटांना प्रेक्षक अधिक पसंती देताना सध्या विविध भाषेतील चित्रपटसृष्टीतून दिसत आहे. अशात ‘हैदराबाद मुक्ती संग्राम’ या ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘रजाकार’ (Razakar: The Silent Genocide of Hyderabad) हा चित्रपट लवकरच भेटीला येणार असून मुळ तेलुगू भाषेतील चित्रपट (Razakar: The Silent Genocide of Hyderabad) आता मराठी आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.
 
हैदराबादमधील निजामाचे क्रुर शासन, त्यावेळी असणारी राजकीय स्थिती, हैदराबाद मुक्त होण्यासाठी स्थानिकांनी केलेले कार्य, सरदार वल्लभाई पटेल यांनी घेतलेले कठोर निर्णय अशा अनेक सत्य घटना 'रजाकार' या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन याता सत्यनारायण यांनी केले असून देशभरातील विविध भाषा बोलणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत हैदराबादमधील हा ज्वलंत इतिहास पोहोचला पाहिजे म्हणूनच मराठी आणि हिंदी भाषेत चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याचे दिग्दर्शकांनी म्हटले. 'रजाकार' चित्रपट देशभरात तेलुगू, तमिळ, कन्नडा, मल्याळम, हिंदी आणि मराठी भाषेत २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘रजाकार’ चित्रपटात महेश अचंता, अनूसया भारद्वाज, राज अरुण, मकरंद देशपांडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
 
 
 
काय दाखवले आहे 'रजाकार' ट्रेलरमध्ये?
 
हैदराबाद मुक्ती संग्राम, त्यावेळी तेथील स्थानिकांवर झालेले अत्याचार व नरसंहार, तेव्हाची राजकीय परिस्थिती, भारत सरकारचा हस्तक्षेप आणि सरदार वल्लभभाई पटेल व तत्कालीन सरकारने हैदराबादसाठी घेतलेले काही कठोर निर्णय आणि एकूणच निजामाचं साम्राज्य टिकवू पाहणारी वृत्ती अशा बऱ्याच घटनांची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. हैदराबादचा सातवा निजाम मीर उस्मान अली खानच्या शासनादरम्यान हा भयंकर नरसंहार घडला असून त्याचे चित्रण या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
 
“या तो मजहब बदलना होगा, या फिर ये राज्य छोड़ना होगा”, “ओम शब्द सुनाई नहीं देना चाहिए और भगवा रंग दिखाई नहीं देना चाहिए”, “मै हैदराबाद को दूसरा काश्मीर बनने नहीं दुंगा.” असे मनाचा ठोका चुकवणारे संवादही ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0