रामजन्मोत्सव दिनी श्री रामललास पंचामृताचा अभिषेक

17 Apr 2024 11:07:48

Ramnavami

मुंबई (प्रतिनिधी)
: अयोध्येत श्रीरामनवमीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. जन्मभूमीवर असलेल्या भव्य राम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळी सर्वप्रथम रामललास पंचामृताचा अभिषेक (Panchamrut Abhishek) करण्यात आला. त्यानंतर अत्तर लेपन करण्यात आले. यादरम्यान झालेल्या मंत्रोपचारांमुळे संपूर्ण गर्भगृहात प्रसन्न वातावरण तयार झाले होते. त्यानंतर घंटानाद आणि शंखनादात श्रीरामललाची आरती करण्यात आली.

हे वाचलंत का? : 'सूर्यकिरणांचा महामस्तकाभिषेक' विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय

रामनवमीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना 'धनिया पंजीरी' प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे. तर रामललासाठी छप्पन भोगचा नैवेद्यही दाखवण्यात येणार आहे. मंदिरात येणारे दर्शनार्थी सात रांगांमधून मंदिरापर्यंत पोहोचतील. सूर्यकिरणांनी महामस्तकाभिषेक हे राम मंदिरातील खास आकर्षण असेल. यासाठी दुपारी १२.१५ वाजताची वेळ निश्चित करण्यात आली आहे. ७५ मिमीच्या तिलकाच्या रूपात रामलल्लाच्या कपाळावर चमकतील आणि सुमारे चार मिनिटे राहतील.


Powered By Sangraha 9.0