अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार

16 Apr 2024 18:18:51
 
lata mangeshkar
 
मुंबई : मंगेशकर कुटुंबियांनी स्थापन केलेली मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्था गेली ३४ वर्षे पुणे येथे कार्यरत आहे. २४ एप्रिल रोजी दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. लता मंगेशकर यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या नावाने सुद्धा पुरस्कार वितरित केला जातो. यावर्षीचा लता मंगेशकर पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. यापूर्वी हा पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही प्राप्त झाला होता.पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे बुधवार २४ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वा आयोजित करण्यात आला आहे.
 
यावर्षी दीनानाथ मंगेशकरांची ८२ व्या पुण्यतिथी त्यानिमित्त निमित्त दिले जाणारे पुरस्कार खालीलप्रमाणे -
१) लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार - प‌द्मविभूषण अमिताभ बच्चन
२) मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार - ए.आर. रहमान (प्रदीर्घ संगीत सेवा)
३) मोहन वाघ पुरस्कार - : गालिब नाटक (उत्कृष्ट नाट्यनिर्मिती २०२३-२४)
४) आनंदमयी पुरस्कार : दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल (समाज सेवा)(आशा भोसले पुरस्कृत)
५) वाग्विलासीनी पुरस्कार : मंजिरी फडके (प्रदीर्घ साहित्य सेवा)
६) मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार - अशोक सराफ (प्रदीर्घ नाट्य-चित्रपट सेवा)
७) मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार - पद्मिनी कोल्हापुरे (प्रदीर्घ चित्रपट सेवा)
८) मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार - रूपकुमार राठोड (प्रदीर्घ संगीत सेवा)
९) मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार - भाऊ तोरसेकर (प्रदीर्घ पत्रकारिता)
१०) मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार - अतुल परचुरे (प्रदीर्घ नाट्य सेवा)
११) मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (विशेष पुरस्कार) - श्री. रणदीप हुडा (उत्कृष्ठ चित्रपट निर्मिती)
वरील सर्व पुरस्कार माननीय अध्यक्ष श्रीमती आशा भोसले यांच्या हस्ते प्रदान केले जातील.
 
पुरस्कार वितरणानंतर 'श्रीशारदा विश्वमोहिनी लतादीदी' हा संगीतमय कार्यक्रम होईल. लता मंगेशकर यांना सांगितीक मानवंदना म्हणून भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यावेळी सादर करतील. कलाकार गायिका 'दीदी' पारितोषिक विजेती विभावरी आपटे-जोशी (एकल संगीत मैफल) वाद्यवृंद सहकलाकार विवेक परांजपे, केदार परांजपे, विशाल गंडूतवार, डॉ. राजेंद्र दुरकर, प्रसाद गोंदकर व अजय अत्रे सादर करतील. हा संगीत कार्यक्रम हृदयेश आर्टस्तर्फे आयोजित करण्यात आला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने ८२ व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0