'सूर्यकिरणांचा महामस्तकाभिषेक' विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय

16 Apr 2024 18:38:46

Suryatilak

मुंबई (प्रतिनिधी) :
अयोध्येत रामनवमीनिमित्त खास श्रीरामललांचा सूर्यकिरणांसह महामस्तकाभिषेक (Suryatilak) करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मंदिर व्यवस्थेशी संबंधित लोक याला विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय म्हणून याकडे पाहत आहेत. वैज्ञानिकांनी केलेल्या अनेक चाचण्यांनंतर महामस्तकाभिषेकासाठी दुपारी १२.१५ वाजताची वेळ निश्चित करण्यात आली आहे. वैज्ञानिकांनी प्रथमतः अयोध्येच्या आकाशातील सूर्याच्या हालचालींची नेमकी दिशा ठरवली आणि वरच्या मजल्यावर आरसा बसवण्याची जागा आणि कोपरा निश्चित केला.

हे वाचलंत का? : रामललांसाठी 'छप्पन भोग'चा नैवेद्य तर भाविकांना 'धनिया पंजीरी'चा प्रसाद

काहीतरी वेगळे करायचे म्हणून रुरकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी सूर्य तिलकाची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला. रामलल्लाच्या कपाळापर्यंत सूर्यकिरण फिरवताना कुठेही विजेचा वापर करण्यात आलेला नाही. ऑप्टोमेकॅनिकल प्रणाली अंतर्गत, उच्च दर्जाचे आरसे आणि लेन्ससह पितळी उभ्या पाईपिंगची व्यवस्था केली गेली. सूर्याची किरणे वरच्या स्तरावरील आरशावर पडतील, त्यानंतर ते तीन लेन्समधून जातील आणि दुसऱ्या स्तरावरील आरशावर पडतील. सरतेशेवटी, सूर्याची किरणे ७५ मिमीच्या तिलकाच्या रूपात रामलल्लाच्या कपाळावर चमकतील आणि सुमारे चार मिनिटे राहतील. हा काळ सुर्याचा वेग आणि दिशा यावरही अवलंबून आहे. मंदिराच्या व्यवस्थेशी संबंधित लोक सूर्य तिलकाच्या यशाने आनंदित आहेत.

Powered By Sangraha 9.0