अल्लाह-हू-अकबर म्हणत चर्चवर दहशतवादी हल्ला! पादरी म्हणतात हल्लेखोरासाठी प्रार्थना करा!

16 Apr 2024 16:21:53

Church Attack


 (ज्या पादरीवर हल्ला झाला त्याचे सोशल मीडियावर लाखो अनुयायी आहेत.)
 
सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनीत सोमवार दि. १५ एप्रिल २०२४ रोजी एका चर्चमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण चार जणांचा मृत्यू झाला. ज्यात एका पादरीचाही सामावेश आहे. हा पादरी लोकप्रिय असून जगभरात त्याचे अनुयायी आहेत. घटनेनंतर स्थानिक आणि पोलीस भिडले. सिडनीतील डाऊनटाऊनपासून ३० किमी पश्चिमेकडे सबअर्ब वेकलेमध्ये हा हल्ला झाला. यात एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला एका चर्चमध्ये लपवण्यात आले. स्थानिकांचा रोष इतका वाढला की त्याला बाहेर काढण्याची मागणी केली जाऊ लागली.
 
इथल्या बोंडी या भागातील बीचसाईड मॉलमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर तीनच दिवसात ऑस्ट्रेलियात आणखी एक मोठी घटना घडली. चर्चच्या सोशल मीडिया पेजवर सुरू असलेल्या लाईव्ह प्रक्षेपणात हा प्रकार कैद झाला. व्हिडिओनुसार, ‘असीरियन क्राइस्ट द गुड शेफर्ड चर्च’च्या बिशप मार मारी इमॅन्युअल सायंकाळी प्रार्थना करत होते. तेव्हा एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि चाकूहल्ला केला. त्याने पादरींच्या छाती आणि डोक्यावर कित्येक वार केले. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.
 
एका व्हिडिओत हा हल्लेखोर अरबी भाषेत बोलत होता. ज्यात तो म्हणतो की, "जर पैगंबरांचा अवमान केला नसता तर आम्ही इथे आलो नसतो. तुम्ही आमच्या धर्मात दखल दिली नसती तर मी इथे आलो नसतो." हा हल्ला कुठल्या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आला होता का याबद्दल अद्याप कळू शकलेले नाही. नाराज नागरिकांनी पोलीसांवर दगडफेक केली. यात शंभरहून अधिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ज्यात दोन जण जखमी झाले. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
दोन जणांनी मीर्ची पावडर स्प्रे पोलीसांवर मारला. बिशप यांचे अनुयायी जास्त आहेत त्यामुळेच ते नाराज होते. कैनी नावाच्या एका स्थानिक व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला बिशपबद्दल नितांत आदर आहे. त्यांच्यावर झालेला हल्ला निंदनीय आहे. दरम्यान हल्लेखोराला एका गुप्त ठिकाणी हलवण्यात आले आहे. याच दरम्यान चर्चतर्फे एक पोस्ट करण्यात आली. ही वेळ प्रार्थनेची आहे. बिशप यांची इच्छा आहे की तुम्ही हल्लेखोरासाठी सुद्धा प्रार्थना करा. 


Church


इमॅन्युअलला २००९ मध्ये पादरी आणि २०११ बिशप ही पदवी प्रदान करण्यात आली. सोशल मीडियावर त्यांचे लाखो अनुयायी आहेत. कोविड काळात सुरू असलेल्या लॉकडाऊनला विरोध करत ही गुलामगिरी आहे, असे म्हटले होते. तसेच संयुक्त राष्ट्राविरोधातही वक्तव्ये केली होती. न्यू साउथ वेल्समध्ये विविध धर्मगुरुंची बैठक पार पडली. ऑस्ट्रेलियातील यहुदी संघटनांनीही सिडनीतील या हल्ल्याची कठोर शब्दांत निंदा केली आहे.



Powered By Sangraha 9.0