देशाच्या लोकशाहीला आणि संविधानाला सर्वात मोठा धोका : आदित्य ठाकरे

16 Apr 2024 16:11:56

Aditya Thackeray 
 
धाराशिव : देशाच्या लोकशाहीला आणि संविधानाला आज सर्वात मोठा धोका आहे, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी केले आहे. महाविकास आघाडीचे धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आदित्य ठाकरे उपस्थित झाले होते. दरम्यान, यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते.
 
आदित्य ठाकरे म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबडेकरांना आपण महामानव मानतो. त्यांनी दिलेलं संविधान, अधिकार आणि कर्तव्य आपण ७५ वर्ष पाळत आलेलो आहोत. त्यांच्याच संविधानाप्रमाणे आपण हा देश चालवत आलेलो आहोत. आज आपल्याला सर्वात मोठा धोका हा देशाच्या लोकशाहीला आणि संविधानाला आहे. ज्या भाजपला संविधान बदलायचं आहे त्यांना तुम्ही निवडून देणार का?," असा सवाल त्यांनी केला.
 
 हे वाचलंत का? - काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने खूप मोठी चूक केली : विशाल पाटील
 
लोकसभा निवडणूकीला काहीच दिवस शिल्लक असून सर्वच पक्षाचे नेत्यांचे प्रचार दौरे सुरु आहेत. यंदा राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायूती असा थेट सामना रंगणार आहे. दरम्यान, महायूती सरकार संविधान बदण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. यातच आता आदित्य ठाकरेंनीही या मुद्दावर भाष्य केलं आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0