मुंबई : मला मुख्यमंत्रीपद हवंय, माझे ४० आमदार फोडले या गोष्टींसाठी मी टीका केली नव्हती तर ती मुद्यांवर होती, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला आहे. राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात महायूतीला आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे म्हणाले की, "काहीजण म्हणतात की, राज ठाकरेंनी भूमिका बदलली. पण सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला भूमिका बदलणं आवश्यक होतं. याला भूमिका बदलणं म्हणत नाही तर धोरणांवरती टीका म्हणतात. त्यावेळी मी तशी टीका केली असून त्याच्या मोबदल्यात काहीही मागितलं नव्हतं. मला मुख्यमंत्रीपद हवंय, माझे ४० आमदार फोडले या गोष्टींसाठी ती टीका नव्हती तर मुद्दयांवर होती. त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत झालेल्या चांगल्या गोष्टींचं मी स्वागतही केलं," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - "हात जोडले तरी तुमचं नाणं कुणी घेणार नाही!"
तसेच यावेळी त्यांनी संजय राऊतावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "मी आताच माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की, ज्यांना कावीळ झालेली असते त्यांना जग पिवळं दिसतं. त्यामुळे ते आताच आतून बाहेर आले असल्याने त्यांचा तसा विचार असू शकतो," असेही ते म्हणाले.