स्टार्टअपसाठी मुद्रा कर्ज हवाय? मग अशा प्रकारे अर्ज करा
मुंबई: प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ही योजना आणली होती. परंतु अनेकांना प्रश्न पडतो की या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
त्यासाठी या काही टिप्स -
१) प्रधानमंत्री आवास योज़नाचे प्रमुख तीन प्रकार असतात. ' शिशू' 'किशोर',' तरूण '.
२) या सरकारी योजनेअंतर्गत १० लाखांपर्यंतचे कर्ज मिळते.
३) उत्पादन, व्यापार व सेवा क्षेत्रातील उद्योगासाठी हे कर्ज मिळते
४) रिझर्व्ह बँकेच्या अधिनियमाच्या आधारे कर्जदार बँक कर्जाचा व्याजदर ठरवते.
५) कर्जदार बँकेकडून या कर्जाच्या प्रोसेसिंग फी देखील ठरवण्यात येते. बँकेच्या अनुसार ही फी बदलू शकते. शिशू कर्जासाठी हे प्रोसेसिंग चार्जेस ५०००० कर्ज मिळू शकते. तरूण विभागात ५०००० ते ५ लाखांपर्यंत कर्ज मिळते व तरूण विभागात ५ ते १० लाखांपर्यंत कर्ज मिळते
कर्जासाठी अर्ज करण्यासाठी महत्वाच्या अटी - १) यापूर्वी कुठले कर्ज घेतले असल्यास ते बुडित नसावे.
२) व्यवसायासाठी आवश्यक ती पात्रता , ज्ञान, कौशल्य त्या व्यक्तीकडे असावे
३) तत्सम उद्योगाच्या गरजेनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक
कुठून कर्ज मिळू शकते - पब्लिक सेक्टर बँक, सहकारी बँक, खाजगी बँक, मायक्रो फायनान्स बँक, एनबीएफसी, ग्रामीण बँक, व इतर मुद्राने मान्यता दिलेल्या आर्थिक संस्था
लागणारी कागदपत्रे - आयडी कार्ड, आधार कार्ड, निवासी पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटोग्राफ, सही, व इतर आवश्यक कागदपत्रे
कुठे कर्ज करू शकतो - www.mudra.org.in वर जाऊन उद्योमिमित्र पोर्टलवर जा
मुद्रा लोन अपलाय नाऊ वर क्लीक करा
आपली पुढील माहिती भरा