संजीव गणेश नाईक यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा करावा: आवाहन

11 Apr 2024 18:32:37

Sanjeev Naik 
 
नवी मुंबई : कार्यकुशल विकासाभिमुख युवा नेतृत्व संजीव गणेश नाईक यांचा १५ एप्रिल २०२४ रोजीचा वाढदिवस केवळ सेवाभावी आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातूनच साजरा करावा, त्याला उत्सवी स्वरूप देऊ नये, असे आवाहन संजीव गणेश नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
संजीव गणेश नाईक हे विकासाची दूरदृष्टी असलेले आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदरसह राज्यात विविध ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात. यावर्षी वाढदिवसाला कोणतेही उत्सवी स्वरूप न देता केवळ विधायक उपक्रमांचे आयोजन करूनच संजीव गणेश नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
 
हे वाचलंत का? - "चला आरशात बघुया!" मनसेने वाचला ठाकरेंच्या दुहेरी भूमिकेचा पाढा
 
रक्तदान, अन्नदान, आरोग्य तपासणी, समाजातील गुणवंतांचा सत्कार, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, फळवाटप अशा समाजाला उपयुक्त ठरणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करावे. वाढदिवसाचा केक कापू नये. हार, तुरे, पुष्पगुच्छ शुभेच्छांसाठी आणू नयेत. सेवाभावी उपक्रमातून मिळणाऱ्या जनतेच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आपल्यासाठी लाखमोलाचे आहेत, अशी भावना संजीव गणेश नाईक यांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0