“विनोदाचं भन्नाट टायमिंग असणारी रसिका जोशी”, संजय नार्वेकरांनी दिला आठवणींना उजाळा

01 Apr 2024 17:43:31
अभिनेते संजय नार्वेकर यांचं सर्किट हाऊस हे जुनं नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलं असून या नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे.
 

sanjay anrvekar  
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत अनेक विनोदी कलाकार होऊन गेले त्यापैकी एक अप्रतिम कलाकार म्हणजे अभिनेत्री रसिका जोशी. नुकतीच संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी ‘महाएमटीबी’ला त्यांच्या सर्किट हाऊस या नाटकाच्या निमित्ताने मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अभिनेत्री रसिका जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला.
 
संजय नार्वेकर म्हणाले की, “रसिका जोशी ही माझी अत्यंत जवळची मैत्रिण होती. आम्ही एकत्रच आमच्या कारकिर्दीची सुरुवात केली. व्यावसायिक नाटक ते चित्रपट असा प्रवास आम्ही सोबत करत होतो. तिच्यासोबत आई नं १, खबरदार हे चित्रपट केले ज्या दोन्ही चित्रपटांत तीने माझ्या आईची भूमिका साकारली होती. रसिकाबद्दल एक गोष्ट मी नक्कीच सांगू इच्छितो की खुप कमी स्त्री अभिनेत्रींकडे विनोदाचे अंग असते, टायमिंग असतं. त्यापैकी आत्तापर्यंत मी पाहिलेली सर्वात बेस्ट विनोदी स्त्री कलाकार ही रसिका जोशी आहे”.
 
अभिनेत्री रसिका जोशी यांचे ७ जुलै २०११ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे नक्कीच मनोरंजनसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली. रसिका जोशी यांनी चश्मेबहाद्दर, भूत अंकल, भूल भूलैय्या, वास्तू शास्त्र, सरकार, ढोल अशा अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या होत्या.
 
 
 
Powered By Sangraha 9.0