मशिदीजवळून जाणाऱ्या शोभायात्रेवर कट्टरपंथींकडून दगडफेक

01 Apr 2024 11:48:37
 shobhayatra
 
जयपूर : राजस्थानमधील कोटा येथे शुक्रवार, दि. २९ मार्च २०२४ रोजी मोठा वाद झाला आहे. येथे स्थानिक जत्रेत सुरू असलेल्या रामलीलाशी संबंधित शोभायात्रा काढली जात असताना कट्टरपंथी जमावाने मशिदीजवळ हल्ला केला. या जमावाने डीजे आणि सर्व उपकरणे तर फोडलीच, पण महिलांनाही सोडले नाही. कट्टरपंथी जमावाने केलेल्या या हल्ल्यात अनेक हिंदू स्त्री-पुरुष जखमी झाले.
 
हे प्रकरण कैथून शहरातील आहे. जिथे राम बारात होत होती. राम मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांनी आरोप केला की, कट्टरपंथी जमावाने मिरवणुकीवर हल्ला केला, डीजे बंद केला आणि वायर आणि लॅपटॉप तोडले. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. यानंतर संतप्त लोकांनी पोलीस ठाण्याबाहेर जमून कट्टरपंथी जमावावर कारवाईची मागणी करत निदर्शने केली. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांनी न्यायाची मागणी करत घोषणाबाजी केली.
 
हे वाचलंत का? -  इंडी आघाडीच्या सभेत राहूल गांधींकडून उद्धव ठाकरेंचा अपमान?
 
याप्रकरणी ग्रामीण एसपी करण शर्मा यांनी सांगितले की, राम बारात होत होती. रामाची मिरवणूक मशिदीसमोरून जात होती. यावेळी नमाज चालू होती. डीजे वाजवण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. कुणीतरी डीजेच्या तारा काढल्या. यावरून दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
 
नमाजाच्या वेळी डीजे वाजवणे आणि घोषणाबाजी केल्याप्रकरणी एका पक्षाने गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही पक्षांच्या आरोपांची पोलीस चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, होळीच्या निमित्ताने कैथून शहरात ७ दिवसीय जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेत रामलीलाही आयोजित केली जाते. या रामलीलेशी संबंधित राम मिरवणूक संकटमोचन हनुमान मंदिरापासून सुरू झाली, ती नाहर कृषी मंडई कालव्यापर्यंत पोहोचणार होती. यावेळी ही मिरवणूक मशिदीसमोरून जात असताना कट्टरपंथींनी राम मिरवणुकीवर हल्ला केला.
 
हे वाचलंत का? -  आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात अरविंद सावंतांच्या विरोधात पोस्टरबाजी!
 
राम मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांवर झालेल्या हल्ल्यानंतर पीडितांनी हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. पोलिसांनी निःपक्षपातीपणे कारवाई न केल्यास कैथून शहर बंद ठेवून निदर्शने करण्यात येतील, असा इशारा हिंदुत्वावादी संघटनांनी दिला आहे. त्याचबरोबर काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0