स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारताची संरक्षण निर्यात २१ हजार कोटींवर!

01 Apr 2024 22:29:03
India Defence Export news


नवी दिल्ली:
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये संरक्षण निर्यातीने विक्रमी 21,083 कोटी (सुमारे 2.63 अब्ज अमेरिकन डॉलर्स) रुपयांचा उच्चांक गाठला आहे.ही रक्कम गेल्या आर्थिक वर्षातील 15,920 कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीच्या तुलनेत 32.5 टक्क्यांनी अधिक आहे. आर्थिक वर्ष 2013-14 च्या तुलनेत गेल्या 10 वर्षांत संरक्षण निर्यात 31 पटीने वाढल्याचे या ताज्या आकडेवारीवरून दिसून येते.
 
संरक्षण उद्योग, संरक्षण क्षेत्रातील खाजगी कंपन्या आणि सार्वजनिक उपक्रमांनी सर्वोच्च संरक्षण निर्यात साध्य करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले आहेत. या आकडेवारीत खाजगी क्षेत्र आणि संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांचे योगदान अनुक्रमे 60 आणि 40 टक्के आहे. याव्यतिरिक्त, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये संरक्षण निर्यातदारांना जारी करण्यात आलेल्या निर्यात परवान्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मधील 1,414 निर्यात परवान्यांच्या तुलनेत 2023-24 मध्ये ही संख्या 1,507 वर पोहोचली आहे.
मोदी सरकारच्या काळात निर्यातीत २१ टक्के वाढ

दोन दशकांची तुलनात्मक आकडेवारी म्हणजे 2004-05 ते 2013-14 आणि 2014-15 ते 2023-24 या कालावधीत संरक्षण निर्यातीत 21 पट वाढ झाल्याचे दिसून येते. 2004-05 ते 2013-14 या कालावधीत एकूण संरक्षण निर्यात 4,312 कोटी रुपये होती, जी 2014-15 ते 2023-24 या कालावधीत 88,319 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.



Powered By Sangraha 9.0