नव्या करप्रणालीत कुठलाही बदल न झाल्याची अर्थमंत्रालयाची स्पष्टोक्ती

01 Apr 2024 14:07:12

IT Return
 
 
मुंबई: अर्थमंत्रालयाने नव्या आयकर प्रणालीत कुठलाही बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या कर प्रणालीत बदल होणार असल्याच्या पोस्ट सोशल मिडियावर फिरत असताना हे स्पष्टीकरण अर्थमंत्रालयाने दिले आहे. १ एप्रिल २०२४ पासून लागू असलेल्या कर प्रणालीत कुठलाही बदल झालेला नाही. केवळ ज्या व्यक्तींच्या कर प्रणालीत कराचे दर अत्यंत कमी होते केवळ त्यांच्यासाठी ही नवी प्रणाली असल्याचे स्पष्टीकरण आपल्या प्रसिद्धीपत्रात दिले गेले आहे.
 
जुन्या कर प्रणालीत मासिक वेतन ५०००० रुपये व कुटुंब निवृत्तीवेतन १५००० रुपये वरील फायदे व तरतूदी जुन्या करप्रणालीत उपलब्ध नव्हत्या. अर्थमंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, 'नवी प्रणाली ही यापुढे लागू होणारी प्रणाली आहे. जर करदात्यांच्या मनात जुनी कर प्रणाली फायदेशीर वाटल्यास ते जुनी प्रणाली निवडूक शकतात. नव्या करप्रणाली नाकारण्यात येणार असल्यास इन्कम टॅक्स रिटर्न आर्थिक वर्ष २४-२५ पर्यंत भरता येणार आहे.'
 
नव्या करप्रणालीत ३ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. ३ ते ६ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना ५ टक्के कर भरावा लागणार आहे. ९ ते १२ लाख उत्पन्न असणाऱ्यांना १५ टक्के व १२-१५ लाख उत्पन्न असणाऱ्यांना २० टक्के कर भरावा लागणार आहे. १५ लाखांच्या वर उत्पन्न असल्यास १५ टक्के कर भरावा लागणार आहे. आर्थिक वर्ष २३-२४ पासून नवी प्रणाली ही दैनंदिन स्वरुपाची असणार आहे. जर जुनी कर प्रणाली निवडायची असलास करदात्यांना इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करताना हे नोंदणीकृत करावे लागणार आहे.
 
ज्या पात्र व्यक्तींचे व्यवसायिक उत्पन्नच नसेल त्यांना दरवर्षी आपल्या सोयीप्रमाणे जुनी किंवा नवी करप्रणाली अवलंब करण्याची सवलत देण्यात आली आहे.
 
Powered By Sangraha 9.0