नाशिकच्या जागेवरून भूजबळांचं स्पष्टीकरण, म्हणाले, "ज्याला तिकीट मिळेल..."

01 Apr 2024 12:33:20

Chhagan Bhujbal 
 
नाशिक : महायूतीमध्ये नाशिकच्या जागेवरून सध्या चर्चा सुरु असून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. यातच आता मंत्री छगन भूजबळ यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ज्याला तिकीट मिळेल त्याच्यासाठी आपण काम करु, असे छगन भूजबळांनी म्हटले आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
छगन भूजबळ म्हणाले की, "नाशिकमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे प्रचार करत आहेत. भाजपचे १०० च्या वर नगसेवक, आमदार आहेत. प्रयत्न करणं अजिबात चूक नाही. त्याचं मला अजिबात दु:ख नाही. ज्याला कुणाला तिकीट मिळेल आम्ही सगळे त्याचं काम झटून करु," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
 
हे वाचलंत का? -  "ज्यांनी कधी खिशातून रुपया काढला नाही ते मणिपूरचा खर्च देणार!"
 
संजय राऊतांबद्दल बोलताना ते म्हणाले की, "निवडणूका जवळ आल्याने कोण काय आरोप करेल याबद्दल काहीही सांगता येत नाही. पण राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तींचा जाण्या-येण्याचा खर्च जास्त असतो. त्यांची सुरक्षा जास्त असते. यावरही तुम्ही टीका करायला सुरुवात केली तर कसं होईल?," असा सवाल त्यांनी केला.
 
तसेच छगन भुजबळ यांनी यावेळी महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या चौकशीवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, "महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून आम्हाला क्लिनचिट मिळालेली आहे. आमच्यातील फक्त एका देशपांडे नावाच्या सेक्रेटरींची केस मागे राहिलेली होती. तिच ही केस आहे. आमच्याबद्दल असती तर आम्ही इथे राहिलो नसतो," असेही ते म्हणाले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0