‘दृश्यम’ चित्रपटातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते कमलेश सावंत यांच बालपण काळाचौकी परिसरात गेलं. बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी भन्नाट किस्से सांगितले.
रसिका शिंदे-पॉल
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत नावाजलेल्या कलाकारांची पाळंमुळं ही महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध गावांशी किंवा मुंबईतील (Mumbai) चाळीशी जोडलेली आहेत. या यादीतील आणखी एक नाव म्हणजे अभिनेते कमलेश सावंत (Kamlesh Sawant). मुंबईची ओळख असणाऱ्या लालबाग-काळाचौकी परिसरात त्यांचं बालपण गेलं. मुंबईला चाळ संस्कृतीचा अनमोल ठेवा देऊ करणाऱ्या या भागातून आलेल्या कमलेश सावंत यांनी काळाचौकी परिसराचं ‘महाएमटीबी’शी बोलताना सुंदर वर्णन केलं.
हे वाचलंत का? - मुकेश व नीता अंबानी यांनी अनंतच्या ‘गॉडफादर’ बद्दल यांचा खुलासा
लालबाग-काळाचौकीची माणसं, आम्हाला...
आजवर प्रत्येक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये पोलिसांची भूमिका करणाऱ्या कमलेश सावंत यांनी पहिल्यांदा पोलिसांची भूमिका हे केवळ २ संवादाची केली होती. याबद्दल आठवण सांगताना ते म्हणाले की, “अभिनेता सुशांत शेलार आणि इतर आमच्या सहकारी कलाकार मित्रांचा एक ग्रुप होता. त्याअंतर्गत आम्ही कामं करायचो. त्यावेळी मुकुल अभ्यंगकर हे जर्मनी वरुन शिकून आलेले एक लेखक होते. त्यांच्या गुब्बारे या एका मालिकेसाठी त्यात एका पोलिसाची भूमिका करायची होती. मला सुशांतने फोन करुन सांगितलं की एक काम आहे दोन संवाद आहेत ये. मी गेलो आणि माझं काम करुन आलो. त्यानंतर सुशांतने मला यावेळी लहान भूमिका केली, पुढच्या वेळी मोठी भूमिका द्या असं मुकूल यांना बोलून ये असं सांगतिल. मी त्यावर त्याला म्हणालो, हे मला जमणार नाही. आपण लालबाग काळाचौकीच माणसं आहोत, समाधानी आहोत, असं मागणं मला जमणार नाही”. कमलेश सावंत यांच्या या वाक्यावरुन आपल्या संस्कृतीशी, मातीशी त्यांचे किती घट्ट नाते आहे हे देखील सिद्ध होते.
वक्तशीरपणा आणि अमिताभ बच्चन
“ ‘खाकी’, ‘दीवार’ आणि ‘फॅमिली’ असे लागोपाठ तीन हिंदी चित्रपट मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले. त्यापुर्वी मी मराठी चित्रपटात काम केलं नव्हतं. अमिताभ बच्चन म्हणजे व्यासपीठ आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत, त्यापैकी एक म्हणजे वेळेची कदर. खाकीच्या सेटवर ते ७ च्या कॉल टाईमला बरोबर ७ वाजता वेशभूषेसह तयार असायचे. त्यामुळे त्यांच्याकडून शिस्तबद्धपणा, कामाप्रती आपुलकी आणि निष्ठा या बाबी नक्कीच शिकलो”, असे म्हणत तयांनी अमिताभ बच्चन यांचे कौतुक केले.