मुंबई : बँकेत नोकरी करायची आहे तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बँकेत नोकरी करण्यासाठी अनेक तरुण उत्सुक असतात. 'हयुमन कॅपिटल मॅनेजमेंट'कडून याच तरुणांकरिता आता नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया' मधील रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मधील 'हयुमन कॅपिटल मॅनेजमेंट'अंतर्गत अॅप्रेंटिसशीपसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. या अॅप्रेंटिसशीपकरिता आवश्यक निकषांबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
पदाचे नाव -
अॅप्रेंटिसशीप (३००० जागा)
शैक्षणिक पात्रता -
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर
नोकरीचे ठिकाण -
संपूर्ण भारत
वयोमर्यादा -
किमान २० वर्षे
एससी, एसटी उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट.
स्टायपेंड -
१५ हजार रुपये.
अर्ज शुल्क -
पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी ४०० रुपये
एससी, एसटी, इडब्ल्यूएस व महिला उमेदवारांकरिता ६०० रुपये
उर्वरित उमेदवारांकरिता ८०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल.
सदर भरतीकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०६ मार्च २०२४ असेल.
जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा