"हिंद से प्यार करनेवाले हम सब हिंदू है!" अंगावर शहारे आणणारा स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा ट्रेलर

05 Mar 2024 16:46:38
'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चरित्रपटाच्या ट्रेलरला जितका उदंड प्रतिसाद मिळत आहे त्याहून जास्त दाद यातील संवादांना मिळत आहे.
 
 
 
veer savarkar
 
मुंबई : चरित्रपट म्हणजे त्या महान व्यक्तिचे विविध पैलु प्रेक्षकांसमोर मांडणे आणि आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत अभिनेता रणदीप हुड्डा याने जाणीवपुर्वक ती जबाबदारी निभावलेली दिसून येते. आगामी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer Savarkar) या चरित्रपटाच्या निमित्ताने रणदीप केवल अभिनेता म्हणून नाही तर पहिल्यांदाच दिग्दर्शक आणि लेखकाच्या भूमिकेतचही दिसून येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यातील "हिंद से प्यार करनेवाले हम सब हिंदू है!", हे वाक्य वीर सारवरकरांच्या (Swatantryaveer Savarkar) मुखातून ऐकताना अंगावर काटाच उभा राहतो.
 
हे वाचलंत का? निलेश लंके का नाराज?, खासदाराच्या वक्तव्याने चर्चांना उधाण!  
 
दरम्यान, काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता, तेव्हापासूनच या चित्रपटात वीर सावरकरांबद्दल नेमके काय दाखवले जाणार? त्यांची कोणती बाजू आणि न माहित असलेला इतिहास उलगडला जाणार याची उत्सुकता लागली होती. ती उस्तुकता आणखी ताणून धरणारा स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील मुख्य घटनांवर आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानावर प्रामुख्याने प्रकाश टाकण्यात आला आहे.
 
याशिवाय चित्रपटात विनायक दामोदर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्यातील वैचारिक मतभेददेखील ठळकपणे दाखवण्यात आले आहेत. सोबतच सावरकरांना ठोठावण्यात आलेल्या दोन जन्मठेपेच्या शिक्षा, शिक्षा भोगून आल्यानंतर भारतात त्यांच्यावर अन् त्यांच्या कुटुंबावर झालेला अन्याय यावरही चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटातील दृश्यांसोबतच संवादही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे आहेत.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर या चरित्रपटात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, मोहम्मद अली जिन्ना, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बॉस, भिकाजी कामा, मदनलाल धिंगरा, भगत सिंह इत्यादि क्रांतिकराकांच्या भूमिकाही चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. २२ मार्च २०२४ रोजी हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत देशभरात प्रदर्शित होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0