जागतिक महिला दिनी सायन रुग्णालयात महिला करणार रक्तदान

घे भरारी रक्तदानासाठी, रक्तकेंद्रात महिलांचा रक्तदान करण्याचा निर्धार

    04-Mar-2024
Total Views | 124

जागतिक महिला दिन म्हटलं की महिलांमध्ये वेगळाच उत्साह असतो. ऑफिसमध्ये, सोसायटी मध्ये, महिला मंडळात,संस्थेमध्ये अथवा व्हाट्सएपच्या महिला ग्रुप मध्ये वेगवेगळ्या पार्टीचे अथवा मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. फक्त एन्जॉय, मज्जाच मज्जा याच उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

World Womens Day Initiative


पण याला अपवाद असते ते जीवनदाता सामाजिक संस्थेच्या महिला परिवाराकडून आयोजित रक्तदान शिबिर. एक वेगळा पायंडा, सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने जीवनदाता महिला परिवार ८ मार्च, जागतिक महिला दिन गेली अनेक वर्ष जीवनदाता संस्थेमार्फत केवळ महिलांसाठीच रक्तदान शिबिराचं आयोजन करत असते.
 
हा एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम केवळ महिलांसाठीच विशेष प्लॅटफॉर्म उपलब्ध असतो. 'रक्तदानात महिला कुठेच दिसत नाही, नेहमीच यांचे हिमोग्लोबिन कमी असे महिलांना हिणवले जाते.' याला जशास तसे उत्तर म्हणून या रक्तदान शिबिरात केवळ महिलाच रक्तदान करतात. शिबिराचे आयोजन /नेतृत्व सुद्धा महिलाच करतात, हे विशेष.

या विशेष महिला रक्तदान शिबिरात येऊन महिला रक्तदान करून एका वेगळ्याच आनंदाला गवसणी घालतात. "कोण बोलतो महिला रक्तदानात मागे, हे बघा आम्ही केले रक्तदान" हे वाक्य अभिमानाने बोलतात. उत्स्फूर्तपणे व उस्ताहाने हे रक्तदान शिबीर मंडपात महिला अक्षरशः रांगा लावून रक्तदानात झेप घेतात. या साठी जीवनदाता संस्थेची टॅग लाईन "घे भरारी रक्तदानासाठी" याचा उदघोष चालू असतो.

हिमोग्लोबिनची तपासणी करूनच येथे रक्त स्वीकारले जाते. १०० मधील ५० महिला केवळ हिमोग्लोबिन कमतरतेमुळे रिजेक्ट होतात. पण पुढील वेळी हिमोग्लोबिन वाढवून 'परत रक्तदानाला येऊ' हा निर्धार करूनच त्या घरी परततात. जीवनदाता संस्थेने यावर्षी सुद्धा विशेष महिला रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. या वेळेच्या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना त्यांच्या हिमोग्लोबिनची लेवल त्याच क्षणी कळणार आहे.

या शिबिरात रक्तदान करण्याहेतू येणाऱ्या सर्व महिलांचा सन्मान करण्यात येईल. रक्तदान करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ५० वर्षावरील रक्तदान करणाऱ्या महिलांचा लक्षवेधी सन्मान करण्यात येईल. यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक महिलेला शाल, फेटा, ढाल-तलवार सोबत महाराष्ट्रीयन नथ(प्रत्येकीला वेगळी) घालून "विरांगना" या संकल्पनेवर फोटो शूट करण्याची संधी मिळणार आहे. रक्तदान क्षेत्रात काम करणाऱ्या काही निवडक महिलांना "विरांगना" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

पिकनिक, पार्टी व ईतर मनोरंजन न करता महिलांच्या हक्काच्या दिवसाला समाजसेवेचे रूप देता येते हे सुद्धा केवळ महिलाच सिध्द करू शकतात. चला तर आपण सर्व महिला मिळून रक्तदान क्षेत्रात विजयाची पताका फडकवण्यासाठी रक्तदानासाठी भरारी घेऊया. प्रयत्न करायला काय हरकत आहे. अशी साद जीवनदाता महिला परिवाराच्याच्या वतीने सर्व रक्तदान करू इच्छिणाऱ्या महिलांना घालण्यात आली आहे. प्रत्येक वेळी स्त्रियांचे हिमोग्लोबिन कमी नसते हा न्यूनगंड बाजूला सारून ईतर महिलांच्या सोबत या केवळ महिलांच्या उत्साहात सामील होण्यास आवर्जून या.जल्लोष करूया. महिलांची जिद्द व ताकद दाखविण्याची संधी दवडू नका.


दिनांक ८ मार्च २०२४
जागतिक महिला दिन
सकाळी ९ ते दुपारी ४
रक्तकेंद्र, सायन रुग्णालय
शीव, मुंबई-२२

संपर्क व अधिक माहितीसाठी
मिनल कुडाळकर पाटील
८२०८६१४४६०
 
ॲड. अमिता सुर्वे
७०६६०९३०८६

अंकीता तुषार कळमकर
९८९०७७९५७३

संध्या प्रकाश लाड
९०२२८२८८१८

संजना सचिन काटकर
९८६०६०३७५३

भारती सचिन भांगरे
८३६९७०५१०३

निकिता नरेंद्र रेडकर
८९५६३२२६४४


आयोजक
जीवनदाता सामाजिक संस्था, मुंबई.

अग्रलेख
जरुर वाचा