"आम्ही काश्मीरला..." भुकेकंगाल पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आळवला काश्मीर राग

04 Mar 2024 12:54:07
 SHARIF
 
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील (Pakistan) मागच्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा अंत जवळ आला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे नेते शाहबाज शरीफ यांची रविवारी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाली. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांनी काश्मीरचे रडगाणे गायला सुरुवात केली आहे. तसेच शेजाऱ्यांसह सर्व प्रमुख देशांशी संबंध सुधारण्याचे आश्वासन दिले.
 
शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी जनतेला संबोधित करताना म्हणाले की, "पाकिस्तान कोणत्याही खेळाचा भाग होणार नाही आणि त्यांचे सरकार मित्र देशांची संख्या वाढवेल. नॅशनल असेंब्लीने काश्मिरी आणि पॅलेस्टिनींच्या स्वातंत्र्यासाठी ठराव पास करावा." काश्मीरच्या कथीत स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा चिंता व्यक्त केली.
 
 हे वाचलंत का? - "हा तर दलाल..." शाहरुख खान 'जय श्रीराम' म्हणाल्यामुळे कट्टरपंथींना पोटशूळ
 
पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस रसातळाला जात आहे. पाकिस्तानकडे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी लागणारे परकीय चलन सुद्धा नाहीये. पाकिस्तानचा सगळा खर्च केवळ कर्जातूनच भागवला जात आहे. तरीही पाकिस्तानच्या पंतप्रधान काश्मिरी राग आवळत आहेत. त्यासोबतचं त्यांनी २०३० पर्यंत पाकिस्तानला जी-२० सदस्यत्व मिळवून देण्याचे वचन दिले.
 
शाहबाज म्हणाले की, "देशाला कोट्यवधी रुपये केवळ व्याजाच्या स्वरूपात द्यावे लागतात. वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवरील वाढत्या कर्जामुळे ऊर्जा क्षेत्र कोलमडत आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स सारख्या सरकारी मालकीच्या संस्थांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. यातून मार्ग काढून आमचे सरकार देशाला विकासाच्या मार्गावर नेईल."
 
 हे वाचलंत का? - "तुमचा अपघात झाल्यास ओरडू नका" - ममतांच्या मंत्र्याने दिली पत्रकाराला धमकी
 
पाकिस्तानमध्ये शाहबाज शरीफ पंतप्रधान झाले असले तरी, त्यांच्याकडे बहुमत नाही. त्यांच्या पक्षाला निवडून आणण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने त्यांना मदत केली होती. तरीही पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या लोकप्रियतेपुढे पाकिस्तानी सैन्याचा पाठिंबा असूनही पीएमएलएन ला विजय मिळवता आला नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0