मुंबई : 'ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन(ओएनजीसी) लिमिटेड'अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. ओएनजीसी लिमिटेडकडून नवीन भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ओएनजीसी लिमिटेडमधील रिक्त जागांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी २९ फेब्रुवारी २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ओएनजीसी लिमिटेड मधील पदभरतीसंदर्भात सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
पदाचे नाव -
भूभौतिकशास्त्रज्ञ (०३ जागा)
सहाय्यक कार्यकारी अभियंता (२२ जागा)
(एकूण २५ जागा)
शैक्षणिक पात्रता -
पदांच्या आवश्यकतेनुसार संबंधित विषयातील पदवीधर
वेतनमान -
६०,००० ते १,८०,००० रुपये.
वयोमर्यादा -
२८ ते ४५ वर्षे
नोंदणी शुल्क -
जनरल, ओबीसी उमेदवारांकरिता १ हजार रुपये
एससी, एसटी उमेदवारांना शुल्कात सूट
इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असेल.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०६ मार्च २०२४ असेल.
ओएनजीसी अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा