"हिंदू हा धर्म नाही, ते तर..." 'ख्रिश्चन मोर्चा'च्या कार्यक्रमात हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य

04 Mar 2024 13:23:35
 Anti Hindu
 
रायपूर : छत्तीसगडच्या जशपूरमध्ये जनजागृती सभेच्या नावाखाली हिंदू देवी-देवतांविषयी असभ्य भाषेचा वापर करण्यात आला. भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा आणि राष्ट्रीय एकता परिषद यांनी संयुक्तपणे ही बैठक आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये हिंदू देवता आणि हिंदूंच्या विरोधात भडकावल्या जात आहे.
 
या प्रकरणी विहिंपसह सर्व हिंदू संघटनांनी हस्तक्षेप करून कारवाईची मागणी केली, त्यानंतर राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाच्या १२ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी जशपूरच्या कुंकुरी पोलीस स्टेशन परिसरात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या मंचावरून हिंदुत्वाविषयी असभ्य भाषेचा वापर करण्यात आला.
 
हे वाचलंत का? -  "आम्ही काश्मीरला..." भुकेकंगाल पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आळवला काश्मीर राग
 
या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कर्नेल सिंग यांनी हिंदू धर्माविरोधात अपमानास्पद, असभ्य आणि चुकीची टिप्पणी करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. या याचिकेत म्हटले आहे की, आरोपींनी विविध पंथ आणि धर्माच्या लोकांमध्ये शत्रुत्व आणि द्वेष निर्माण करून राष्ट्रीय अखंडता आणि सार्वभौमत्वाचा ऱ्हास केला आहे.
 
लोकांना हिंदूं धर्माच्या विरोधात भडकावत ते मंचावरून म्हणाले, “स्वतःला हिंदू म्हणणे बंद करा. हिंदू हा धर्म नाही, हिंदू म्हणणे ही शिवी आहे. हा फारसी भाषेतील शब्द आहे. म्हणजे चोर, डाकू, दरोडेखोर, गुलाम. ४००० वर्षांपासून आपण ३.५ टक्के ब्राह्मणांचे गुलाम आहोत, त्याचप्रमाणे आज आपल्याला हिंदू धर्माच्या नावाखाली गुलाम बनवले जात आहे."
 
 हे वाचलंत का? - "हा तर दलाल..." शाहरुख खान 'जय श्रीराम' म्हणाल्यामुळे कट्टरपंथींना पोटशूळ
 
सभेच्या व्यासपीठावरून लोकांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ईव्हीएम फोडण्यासही सांगण्यात आले. यादरम्यान एका वक्त्याने २०२३ मध्ये झालेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांवरही प्रश्न उपस्थित केले. वक्त्यांच्या वादग्रस्त भाषणांचे व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केले जात आहेत. वादग्रस्त भाषणांचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर १२ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कुंकुरी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम १५३ (अ), १५३ (बी), २९५ (अ), ५०५ (२), १०९, २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0