केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे भाजपच्या जाहीरनाम्याची सूत्रे!

30 Mar 2024 18:34:34
rajnath-singh-made-chairman-of-manifesto-committee


नवी दिल्ली :     
आगामी लोकसभा निवडणूक २०२४ करिता भाजपकडून जाहिरनाम्यासाठी समितीची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून लोकसभा निवडणुकीकरिता जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. पक्षाकडून स्थापन करण्यात आलेली जाहिरनामा समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी २७ सदस्यीय जाहीरनामा समिती स्थापन केली असून सदर समिती पक्षाचा जाहीरनामा तयार करेल, म्हणजेच भाजपकडून जनतेला कोणती आश्वासने असतील. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचीही कल्पना येईल.


हे वाचलंत का? - पीएफआयच्या ३ दहशतवाद्यांना ईडीकडून अटक!


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. या निवडणूक जाहीरनामा समितीची जबाबदारी पक्षाचे दिग्गज नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना संयोजक आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांना सहसंयोजक बनवण्यात आले आहे.

या समितीमध्ये विविध राज्यातील २७ सदस्यांचा समावेश आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वसर्मा, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान अर्जुन मुंडा, भूपेंद्र यादव, अर्जुनराम मेघवाल, अनील अँटनी, रविशंकर प्रसाद, सुशील मोदी, ओ.पी. धनखड, मनजिंदर सिंग सिरसा आदींचा समावेश आहे.




Powered By Sangraha 9.0