कारवी इन्व्हेसटर सर्विसेसवर सेबीचा घाला ! कारवाई करत नोंदणी रद्द केली

30 Mar 2024 11:07:11

Karvy
 
मुंबई: सेबीने (सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) कारवी इन्व्हेसटर सर्विसेसवर कडक कारवाई करत त्यांचे मर्चंट बँकिंगची नोंदणी रद्दबादल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कारवी कंपनीवर मोठा घाला पडत आपल्या मर्चंट बँकिंग सर्विसेस बंद कराव्या लागल्या आहेत. १५ मार्च ते १७ मार्च २०२३ या कालावधीत सेबीने कंपनीच्या कार्यालयात छाननी केली होती.
 
या कालावधीत कारवी इन्व्हेसटर कंपनीच्या अधिकृत पत्ता व नोंदणीकृत पत्यावर संबंधित कार्यकालीन कामकाज होत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या पत्यावर कारवी इन्व्हेसटर कंपनीचे मर्चंट बँकिंगचे कामकाज होत नव्हते. कामकाज करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधाच नसल्याने अखेर सेबीने यावर कारवाई केली आहे.
 
'या सेवेसाठी आवश्यक ती पायाभूत सुविधा नसून कार्यालय, यंत्रणा यांची वानवा आढळली आहे. मर्चंट बँकिंग कामकाजासाठी आवश्यक किमान २ कर्मचाऱ्यांची संख्या आढळली नाही. व्यवसायासाठी या गोष्टी आवश्यक असताना याचा विपरित परिणाम ग्राहकांच्या गुंतवणूकीवर होता. या कंपनीचे संचालक हे सिक्युरिटी मार्केटच्या मर्चंट बँकिंग अधिनियमाच्या पात्रतेत देखील बसत नव्हते' असे या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सेबीने आपल्या कारवाई बाबतीत म्हटले आहे. सेबीने आपली २४ पानांची सूचना यादी या प्रकरणात काढली आहे.
 
या पत्रकानुसार, कारवी इन्व्हेसटर सर्विसेचे नोंदणी प्रमाणपत्र तत्काळ रद्द करण्याचे निर्देश सेबीने दिले आहेत‌. एप्रिल २०२३ मध्ये कारवीला सेबीने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नवीन ग्राहक मिळवण्यासाठी बंदी घातली होती.
 
Powered By Sangraha 9.0