एल अँड टी फायनान्स होल्डिंग्सचे नाव बदलून एल अँड टी फायनान्स लिमिटेड झाले

30 Mar 2024 12:06:50

L & T Finance
 
मुंबई: एल अँड टी फायनान्स होल्डिंग्सचे नाव बदलून एल अँड टी फायनान्स लिमिटेड असे झाले आहे. एल अँड टी फायनान्स होल्डिंग्सने रजिस्ट्रार ऑफ कंपनींकडे नाव बदलण्यासाठी प्रस्ताव दिला होता. तो मंजूर झाला असुन विना बँकिंग वित्तीय संस्था असलेल्या एल अँड टी फायनान्स होल्डिंग्सचे नवे नाव एल अँड टी फायनान्स लिमिटेड (LTFL) असणार आहे.
 
एल अँड टी फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक सुदिप्ता रॉय यांनी, या दोन्ही कंपनीचे विलीनकरण झाल्यानंतर एकत्र मोठी एनबीएफसी कंपनी म्हणून हे रिब्रँडिग होत असल्याचे म्हटले आहे.
 
याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले,' हा घेतलेला पुढाकार आमच्या कंपनीची मोठी एनबीएफसी (विना बँकिग वित्तीय संस्था) निर्माण करण्याची प्रतिबद्धता दिसून येते‌.या एक छताखाली एनबीएफसी एकत्र आल्यानंतर या कंपनीमार्फत आम्ही ग्राहकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देऊ व भविष्यातील कंपनीच्या मोठ्या वाढीसाठी आम्ही प्रयत्न करू.'
 
डिसेंबर २०२३ मध्ये कंपनीने एल अँड टी फायनान्स, एल अँड टी इन्फ्रा क्रेडिट, एल अँड टी म्युचल फंड व एल अँड टी म्युचल फंड या एनबीएफसीचे एकत्रीकरण केले होते. नवीन विलीनीकरणाबाबत एल अँड टी कंपनीचे सेक्रेटरी अपूर्व राठोड यांनी यासंबंधीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून एल अँड टी फायनान्सच व एल अँड टी इन्फ्रा क्रेडिट यांचे रजिस्ट्रेशन परत करत विलीनीकरणची प्रकिया सुरु झाल्याचे म्हटले आहे.
 
याविषयी अधिक माहिती देताना राठोड म्हणाले, '२८ मार्च २०२४ लाख विलीनीकरणानंतर नाव बदलून यासंबंधी कंपनीला इन कॉर्पोरेशनचे प्रमाणपत्र मिळाल्याचे म्हटले आहे.
 
Powered By Sangraha 9.0