“माझ्यातल्या वेडसरपणामुळेच मला...” मुक्ता बर्वेने सांगितला कास्टिंगचा किस्सा

Total Views |
आपल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाकडे आकर्षित करणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. मुंबई-पुणे-मुंबईतील मुक्ता ही जोगवा चित्रपटातील मुक्तापेक्षा भिन्न आहे. ‘अलीबाबा आणि चाळीशी’तले चोर या मुक्ताच्या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने ‘दै. मुंबई तरुण भारत’ने तिच्याशी साधलेला संवाद.
 
mukta baarve
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : विवेक बेळे लिखित आणि आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘अलीबाबा आणि चाळीशी’तले चोर’ (Mukta Barve) हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘महाएमटीबी’शी संवाद साधताना मधुरा वेलणकर हिने अभिनेत्री मुक्ता बर्वेकडून तिचा वेडसरपणा घ्यायला आवडेल असे म्हटले होते. यावर आता अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिने ‘महाएमटीबी’शी संवाद साधताना त्याचे उत्तर दिले आहे.
 
हे वाचलंत का? - कुणी येणार गं! कार्तिकी गायकवाड होणार आई...  
 
मुक्ता बर्वे म्हणाली की, “ ‘अलीबाबा आणि चाळीशी’तले चोर’ या चित्रपटासाठी ज्यावेळी माझं कास्टिंग करण्यात आलं तेव्हा चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक मला म्हणाले होते की, तुझ्या डोळ्यात जी वेडसरपणाची झलक आहे त्याचमुळे चित्रपटातील तुझ्या कास्टिंगला प्राधान्य दिलं आहे. ते ऐकल्यावर नक्कीच आनंद झाला. कारण वेडसरपणा असणं म्हणजे प्रत्येक पात्र साकारताना एक वेड असावं लागतं आणि ते माझ्यात लेखक, दिग्दर्शकांना दिसत आहे हे ऐकून छान वाटतं”.
 
दरम्यान, अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या चित्रपटात ७ मित्रांची एक वेगळीच आणि विचार करायला लावणारी कथा सांगितली आहे. यात सुबोध भावे, श्रुती मराठे, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर, मुक्ता बर्वे, अतुल परचुरे आणि उमेश कामत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.