अरुणा ढेरे यांच्या पुस्तकावर आधारित नृत्य नाटिका

    29-Mar-2024
Total Views |
krushnakinara 
मुंबई : सुप्रसिद्ध लेखिका आणि साहित्यिका अरुणा ढेरे यांनी आपल्या पुस्तकातून अनेक व्यक्तिरेखांना साज चढवला आहे. यापैकी कृष्ण ही थीम केंद्रस्थानी ठेवून एका नृत्य नाटिकेचे अभिवाचन तसेच आयोजन करण्यात आले आहे. दिनांक पाच एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पुण्यातील कोथरूड जवळ हा कार्यक्रम होणार आहे. कोथरूड जवळील एमइएस बालशिक्षण ऑडिटोरियम येथे होणाऱ्या कार्यक्रमाची ऑनलाइन तिकीट विक्री तिकीट खिडकी या पोर्टलवर सुरू आहे.
 
राधा, द्रोपदी आणि कुंती यांच्या आयुष्यातून कृष्णाच्या अथांग व्यक्तिमत्त्वाचा किनारा कुठे दिसतो का, याचा अस्पष्ट शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. यावेळी लेखिका वंदना बोकील कुलकर्णी अभिवाचन करतील, तर मृण्मयी कुलकर्णी, भक्ती झळकी कुलकर्णी, उत्कर्ष दगडे, ऐश्वर्या साने थत्ते, कल्याणी सवडकर, मैथिली भागवत आणि मैथिली पुंडलिक या नृत्य नाट्य सादर करतील.