विजय शिवतारे फडणवीसांच्या भेटीला, माघार घेण्याची शक्यता!

29 Mar 2024 14:50:15
Vijay Shivtare mets devendra fadnavis
 

मुंबई :      शिवसेना माजी मंत्री विजय शिवतारे यांची उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सागर या शासकीय निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीत बारामती लोकसभा जागेबाबतचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याप्रश्नी तोडगा निघण्याची शक्यता आहे. विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढविणार अशी ठाम भूमिका मागील काही दिवसांपासून घेतली होती.
 
दरम्यान, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच, बारामतीची निवडणूक सुनेत्रा पवार विरुध्द सुप्रिया सुळे अशी भावजय-नणंद लढत होणार आहे. या लढतीला विजय शिवतारे यांच्याकडून आव्हान देण्याची तयारी करण्यात आली होती.


हे वाचलंत का? - बच्चू कडूंचे वादळ शमविण्याची ताकद सागर बंगल्यावर - आ. नितेश राणे


शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार असे विजय शिवतारे यांनी सांगितले होते. आता विजय शिवतारे फडणवीसांच्या भेटीनंतर काय भूमिका घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
 
या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली सांगून त्याद्वारे विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आले. त्यामुळे उद्या आपण या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर विस्तृतपणे मांडणार असल्याचे शिवतारे यांनी ठरवले आहे. या बैठकीवेळी शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले हेदेखील उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0