काँग्रेस हा समंजस पक्ष, आता दिल्लीत चर्चा होणार नाही!

ठाकरे गट खासदार संजय राऊत

    29-Mar-2024
Total Views |
INC MVA Sanjay Raut


मुंबई :     'काँग्रेस पक्ष हा एक समजूतदार पक्ष आहे, तसेच आता जागावाटपासाठी दिल्लीत चर्चा होणार नाही, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष आपल्या जागा सोडण्यासाठी तयार नसले तरी आम्ही नाराज नाही, तसेच महाविकास आघाडीत कुणीही नाराज नसल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत हे खोटं बोलत आहेत असा आरोप करण्यात आले होते. त्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, वंचितला ५ जागांचा प्रस्ताव देण्यात आला पहिल्या दिवसापासून वंचितला सन्मानपूर्वक वागणूक देण्यात आली असेही राऊत म्हणाले.


हे वाचलंत का? - काँग्रेसकडून १७०० कोटींची करचोरी? आयकर विभागाची कारवाई रोखण्यास कोर्टाचा नकार


त्याचबरोबर, वंचित आणि शिवसेना(ठाकरे गट) यांच्यात सर्वात आधी युती झाली होती तसेच आमच्यात काहीच खोटं नाही. रामटेक आणि अकोल्याची जागा यासह अन्य ३ जागा वंचितला देण्याचा विचार सुरू होता. तसेच, अकोल्याची जागा काँग्रेस पक्षाची असून आमच्यात त्यासंदर्भात चर्चाच झाली नाही, असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून वंचितला ५ जागा देऊ असे सांगत आहोत. त्याचबरोबर, मविआतील घटक पक्षांची खेळीमेळीत चर्चा झाली असून कुणीही जागावाटपावर नाराज नाही. मविआच्या सर्व बैठका बाहेरच झाल्या असून 'सिल्व्हर ओक'वर एकही बैठक जागावाटपाबाबत झाली नसल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले. राज्यातील संपूर्ण ४८ जागा मविआ लढविणार आहे.