शिवजन्माची कथा

    28-Mar-2024
Total Views |
 

shivajanm 
 
 
 
शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीयेला झाला. परंतु कालगणना सोयीस्कर म्हणून आपण १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करतो. परंतु या शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी जिजाऊंना लागलेले डोहाळे आणि त्याची कथा मी तुम्हाला सांगणार आहे..
 
महालाच्या आतल्या एका जाबत्यामध्ये विजयरावांचे खासगी शस्त्रागार होते. देवपूजेमध्ये मग्न असणाऱ्या सरसादेवींच्या कानावर पाठीमागच्या भिंतीकडून सपसप असे आवाज आले. त्या दिशेला कोकणाकडची खोल दरी होती. त्या चमकल्या. इकडे भलत्या दिशेला कोण खेळत आहे तलवारबाजी? त्या औत्सुक्याने बाहेर डोकावल्या. तेव्हा जिजाऊंच्या हाती एक तलवार आणि दुसरी नर्मदेच्या हाती दिसली. नर्मदा बिचारी गोंधळली होती. जिजाऊंच्या प्रकृतीकडे लक्ष देत ती कशीबशी घाबरूनच तलवार पेलत होती. तो देखावा बघून सरसादेवी लगबगीने पुढे झाल्या आणि विचारू लागल्या, "अहो अहो जिजाऊसाहेब, काय चालवलंत हे?"
"बसल्याबसल्या अंमळ कंटाळा आला होता!"
"अगं बाई! पण त्यासाठी अशा स्थितीत हा रणखेळ!"
"काय करावं समजतच नाही. मनाचा गोंधळ उडतो बधा आक्कासाहेब," जिजाऊ तक्रारीने बोलल्या, "पोटातला बाळराजा आणि त्याची ती आतल्या आत चालू असलेली चळवळ आणि तळमळ स्वस्थच बसू देत नाही, तेव्हा म्हटलं थोडा हात साफ करून घ्यावा."
सरसादेवी मोठ्याने हसल्या आणि जिजाऊंना घेऊन आत महालात वळल्या. दुपारी छोट्या जयंतीने भोजनाच्या पाटांभोवती छान रांगोळ्या काढल्या होत्या. जिजाऊ एका मोठ्या पाटावर पाय मुडपून अलकट घालून बसल्या होत्या. सकाळची आपली तलवारबाजी आठवून खु‌ङ्कन हसत जिजाऊ बोलल्या, "काय सांगावं विहीणबाई अंगातल्या ह्या सैरभैर अवस्थेला? कधी अंबारीतून फिरावं वाटतं. कधी वाघावर स्वार होऊन त्याचे कान पकडावेसे वाटतात. पिवळ्याधमक सुवर्णाच्या रत्नजडित सिंहासनावर बसावं, निळ्या आभाळात मोरणीसारखा मुक्त विहार करावा असंही वाटतं!"
"मोठे गमतीदारच दिसतात तुमचे डोहाळे!" सरसादेवी कुतूहलाने म्हणाल्या. "हो ना! कधी वाटतं मोठमोठी मंदिरं बांधावीत. मुक्तहस्ते दानधर्म करावा. धर्मस्थापना करावी."
"काय? धर्माची स्थापना?"
"हो 5 माणुसकीच्या धर्माची। नदीचं विशाल पात्र जसं असंख्य प्रवाहांना आपल्या कवेत घेऊन पुढे सरकतं, तसा सर्वसमावेशक धर्म सर्व रंजल्यागांजल्या आणि पिचल्या जीवांचा तो विसावा असावा."
चिका विकाऊंना कंठ दाटला. त्या म्हणाल्या, "विहीणबाई, एका जन्मात किती घाव सोसायचे? आता शरीराला आदतच पडल्यासारखी झालेय. अखंड किती, एकरष्ट, वनवास आणि विजनवास हे सारे शब्द जसे काही आमच्या सोबतीसाठीच जन्माला आलेत!"
बबीलताबोलता नकळत जिजाऊंचे डोळे भरून आले. तशा सरसादेवी त्यांच्या डोळ्यांकडे एकटक पाहत राहिल्या, थोड्या वरमल्याही.
"माफ करा आक्कासाहेब. हे आमचे अश्रू नाहीत. आमच्या सर्वांगातून पाझरणारा हा कवत निखाऱ्यांचा द्रव आहे. चार-चार पातशाह्यांच्या छपरांवर सोन्याची कौलं अंवरणारे आमचे घरधनी! आज आम्हाला आमच्या हक्काचा महाल नव्हे पण एखादं दालन तरी आहे का? अशा पराक्रमी पुरुषाच्या स्वीला आपल्या बाळंतपणासाठी एका आडबाजूच्या किल्ल्यावर आश्रय घेणं भाग पडावं, हा तर पिल्लाच्या जन्मासाठी पक्षिणीने दुसऱ्या वृक्षावरचं घरटं शोधण्यासारखाच प्रकार झाला."
"जिजाऊसाहेब, आपण आम्हाला परक्या मानता का?"
"तसं नाही हो, आपल्या विशाल हृदयाची आम्हाला कल्पना आहेच. आम्ही तुमचे ऋणी आहोत; पण काय सांगावं, आता 'घाव'च आमचे देव झालेत होऽ!" पाहुणे विजयराव विश्वासराव यांचे सक्त आदेश होते. किल्ल्यावर जिजाऊंना कोणतीही बाब कमी पडता कामा नये. त्यांच्या सुकर प्रसूतीसाठी गडावर दास-
दासी, कारभारी, कारकून सर्व जणच धावपळ करत होते. विशेषतः, जाऊबाई
दुगदिवी आणि छोट्या सूनबाई जयंती तर अहोरात्र राबत होत्या.
 
जिजाऊंसाठी जीवन म्हणजे सुख-दुःखाचा सततचा खेळच बनला होता. महालात बाळाच्या स्वागताची उत्तम तयारी चालली होती. दुपारपर्यंत तर स्त्रियांची, कारागिरांची खूप गर्दी असायची. सायंकाळी वर्दळ खूप कमी असायची. अन् रात्र तर जिजाऊंना जशी काही खायला उठायची. सततच्या विवंचना आणि चिंता त्यांची पाठ सोडायला तयार नव्हत्या. दक्षिणेतली बदलणारी राजकारणे, शहाजीराजांसारख्या पराक्रमी पतिराजांच्या वाट्याला येणारे अपयश, फसवणारा काळ आणि लुबाडणारी माणसे. त्या सततच्या घोराचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला होता. त्या अतिशय कृश आणि खंगल्यासारख्या दिसू लागल्या. त्यांच्या डोळ्यांखाली गडद अर्धवर्तुळे दिसू लागली. नेमके काय होते ते? काजळ, काजळी की काळजी? नेमका मिलाफ तरी कशाचा समजायचा? आणि अशात एक घटना घडली. नवा काळच बालरुपात जन्माला आला. शिवजन्म झाला. 
हा प्रसंग कादंबरीकार विश्वास पाटील यांनी महासम्राट या कादंबरीत लिहिलेला आहे.