दिल्ली मद्य घोटाळा : के कविता यांच्या अडचणीत वाढ

26 Mar 2024 15:13:44
delhi-excise-policy-case-brs-leader-k-kavitha



नवी दिल्ली :
      दिल्ली मद्य घोटाळ्यात केसीआर कन्या व बीआरएस नेत्या के. कविता यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने के. कविता यांना जामीन नाकारत दि. ०९ एप्रिलपर्यंत तुरुंगात पाठविले आहे. ईडीने म्हटले की, अन्य आरोपींशी आमना-सामना होणे अद्याप बाकी आहे.
 
दरम्यान, दि. २३ मार्च २०२४ रोजी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने भारत राष्ट्र समितीच्या नेत्या कविता यांच्या ईडी कोठडीत २६ मार्चपर्यंत वाढ केली होती. त्यानंतर आता न्यायालयाने जामीन नाकारत ०९ एप्रिलपर्यंत कोठडीत रवानगी केली आहे. तेलंगणा विधान परिषदेच्या सदस्या के. कविता यांना १५ मार्च रोजी हैद्राबाद येथील बंजारा हिल्स येथील राहत्या घरातून अटक केली होती.


हे वाचलंत का? - केजरीवालांचा ईडी कोठडीतून राज्यकारभार!, भाजपकडून राजीनाम्याची मागणी


दिल्ली न्यायालयाने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची कन्या आणि बीआरएस नेते के. कविताला ९ एप्रिल २०२४ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कविताला अटक केली असून रिमांडची मुदत संपल्यानंतर ईडीकडून कविताला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

रिमांडची मुदत संपल्यानंतर ईडीने दि. २६ मार्च २०२४ रोजी कविताला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने ईडीचा अर्ज स्वीकारत कविताला न्यायालयीन कोठडी सुनावली. आपल्या मुलाच्या परीक्षेच्या आधारावर कविताने कोर्टाकडे अंतरिम जामीन मागितला होता.


Powered By Sangraha 9.0