चंद्रपूरातून सुधीर मुनगंटीवार यांनी भरला उमेदवारी अर्ज

26 Mar 2024 14:48:16

sudhir mungantiwar
 
चंद्रपुर : चंद्रपुर लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजप नेते सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज भरताच सुधीर मुनगंटीवार हे उमेदवारी अर्ज भरणारे विदर्भातील पहीले उमेदवार ठरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत विजय संकल्प सभा घेण्यात आली. त्यानंतर तेथुन जिल्हाधीकारी कार्यालयापर्यंत रॅली काढुन सुधीर मुनगंटीवारांनी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते.
 
“घाई घाईमध्ये मी मंचावर आलोय, जर कोणाचं नाव घ्यायला विसरलो असेल, तर पाय आपटू नका. कारण तुम्ही पाय आपटले, तर निवडणुकीत आपटायची वेळ येईल. मी देवाचा आशीर्वाद घेऊन आलो. मात्र, ज्यांच्या नावांमध्येच देव आहे, ते देवेंद्र फडणवीस आशीर्वाद द्यायला आले असतील, तर जगात कोणीही आपल्याला पराभूत करू शकत नाही. महायुतीचे सर्व घटक आणि कार्यकर्ते कृत्रिमपणे नाही, तर मनापासून कामाला लागले आहेत. म्हणून वाटतं निवडणूक माझी नाही. तर ही बंधूंनो तुमची आहे. म्हणूनच ठरवलं आहे, जिंकलो तर माजायचं नाही, हरलो तर खचायचं नाही.” असं सुधीर मुनगंटीवार यांनी गांधी चौक येथे झालेल्या सभेत म्हटलं आहे.

हे वाचलत का ?- उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात 'अग्नितांडव'!
दरम्यान, सर्वच राजकिय पक्षांनी लोकसभा निवडुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात भाजपने आपले २३ उमेदवारांची नाावे घोषित केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रायगडची जागा सुनिल तटकरे यांना जाहीर केली आहे. महायुती आपल्या सर्व जागा २८ तारखेपर्यंत घोषित करेल असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस वगळता इतर कोणत्यापक्षाने आपल्या जागांची अधिकृत घोषणा केलेली नाही.


Powered By Sangraha 9.0