ज्योती मेटे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, बीडमधून निवडणूक लढणार?

    26-Mar-2024
Total Views |
Shivsangram Jyoti Mete
 


मुंबई :     शिवसंग्रामचे अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे बीडमधून लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम असून, त्यांनी आपल्या सरकारी सेवेचा राजीनामा दिला आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यास त्या अपक्ष लढणार आहेत. त्यामुळे बीड लोकसभा निवडणूक पंकजा मुंडे विरुध्द ज्योती मेटे अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता बळावली आहे.

पंकजा मुंडे यांना बीडमधून भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्योती मेटे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली होती. त्याच दरम्यान बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
 
या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांनी शिवसंग्राम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि शासकीय सेवेचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. कोणत्या पक्षाकडून की अपक्ष लढणार, याबाबत लवकरच भूमिका जाहीर करून, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ज्योती मेटे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्या तरी त्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार किंवा अपक्ष मैदानात उतरणार हे पाहणे महत्वाचे असेल.


हे वाचलंत का? - मोठी बातमी! राज्यात 'या' तारखांना मिळणार भरपगारी सुट्टी


ज्योती मेटेंनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्य्क्त केल्यानंतर त्यांच्याकडून अन्य पक्षातील बड्या नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या होत्या. त्यामुळे मेटे लोकसभा निवडणूक लढविणार, याबाबत चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेटदेखील मेटेंनी घेतली होती. त्याचे महत्त्वाचे कारण शिवसंग्राम हा महायुतीचा घटक पक्ष आहे.

ज्योती मेटे महाविकास आघाडीकडून बीडमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यासाठी त्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या. दरम्यानच्या काळात त्यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली होती. मात्र, असे असतानाच ज्योती मेटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. शिवसंग्राम हा महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या ज्योती मेटे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार किंवा अपक्ष मैदानात उतरणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.