पाकिस्तानी नौदल हवाई तळावर ग्रेनेड हल्ला, बलुच लिबरेशन आर्मीने घेतली जबाबदारी!

    26-Mar-2024
Total Views |
Pakistan Navy Air Base Attack



नवी दिल्ली :   पाकिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या नौदल हवाई तळावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने घेतली असून गेल्या ५ महिन्यांतला हा दुसरा हल्ला आहे. या हल्ल्यासंदर्भात एक ऑडिओही व्हायरल झाला आहे.


 
दरम्यान, सदर हल्ल्यानंतर पाकिस्तानी नौदलानेही प्रत्युत्तर दिले असून या प्रत्युत्तरात ४ हल्लेखोर ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र, मात्र, पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पंरतु, असे जरी असले तरी बीएलएने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.


पाकिस्तानच्या तुर्बत येथे असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या नौदल एअरबेस पीएनएस सिद्दीकीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे बलूच लिबरेशन आर्मीचा (बीएलए) हात असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात स्वयंचलित शस्त्रे आणि ग्रेनेडचा वापर करण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमांना मिळाली आहे. सदर हल्ल्यानंतर नौदलानेही प्रत्युत्तर दिले असून हल्लेखोर ठार झाले.

पाकिस्तानी नौदल हवाई तळावर झालेल्या हल्ल्यात एकूण ६ हल्लेखोर सहभागी होते. त्यापैकी २ हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर तुर्बत विमानतळाच्या हद्दीत घुसले होते. पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत ते मारले गेले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून गटाच्या आत्मघाती युनिट मजीद ब्रिगेडच्या सैनिकांनी एअरबेसवर हल्ला केला आहे.