नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार तथा माध्यम प्रमुख जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर टीका केली असतानाच आता केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी युपीए सरकारची पोलखोल करत जयराम रमेश यांना टोला लगावला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी युपीए सरकारच्या काळाती निर्भया निधीचा एकही पैसा खर्च केला नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, जयराम रमेश यांनी मोदी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्र्यांनी हाणून पाडला असून केंद्रीय मंत्र्यांनी महिला व बाल विकास मंत्रालयाच्या कामांची माहिती विरोधकांना दिली आहे. २०१४ मध्ये यूपीए सरकारच्या काळात महिलांसाठी विशेष स्थापन करण्यात आलेल्या निर्भया निधीचा एक रुपयाही खर्च करण्यात आला नव्हता, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
मंत्री इराणी म्हणाल्या की, मोदी सरकारमध्ये निर्भया फंडातून ४० प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. यासाठी ७२१५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस खा. जयराम रमेश यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. जयराम रमेश यांनी त्यांच्या मंत्रालयावर टीका करणारी एक दीर्घ पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टचा समाचार भाजपकडून एनडीए सरकारच्या कामातून घेण्यात आला आहे.
दि. २५ मार्च २०२४ रोजी जयराम रमेश यांनी ट्विटरवर यासंदर्भात पोस्ट लिहीत मोदी सरकारवर टीका केली होती. या पोस्टच्या माध्यमातून मोदी सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रायलाचा १० वर्षांच्या कामकाजाचा तपशील मांडण्यात आला आहे. तसेच, अंगणवाडी सेविकांपासून ते एनसीआरबीच्या आकडेवारीपर्यंतच्या सर्व मुद्द्यांचे त्यांनी गणन केले आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी स्वतः ट्विटरवर प्रतिक्रिया देत लिहिले की, “मूर्ख जेव्हा इतरांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते स्वतःचा मूर्खपणा अधिक दाखवतात. एका राजपुत्राबद्दल बढाई मारण्याच्या नादात एका दरबारीने स्वतःचे अपयश उघड केले.