भाजपची लोकसभेची सहावी यादी जाहीर! वाचा सविस्तर

26 Mar 2024 16:45:20
BJP Loksabha Election Candidates



नवी दिल्ली :      लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सहावी यादी जाहीर केली आहे. यामध्ये तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राजस्थानसाठी दोन आणि मणिपूरसाठी एका उमेदवाराची नावे यादीत जाहीर करण्यात आली आहेत. भाजपने इंदू देवी जाटव यांना राजस्थानच्या करौली-धोलपूर लोकसभा मतदारसंघातून आणि कन्हैया लाल मीना यांना दौसामधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय इनर मणिपूर विधानसभेच्या जागेवरून थौनाओजम बसंत कुमार सिंह यांच्यावर दावेदारी करण्यात आली आहे.

गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशातील सहा विधानसभा जागांवर लोकसभा निवडणुकीसह होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी नऊ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.


हे वाचलंत का? - केरळमध्ये स्वतःच्या २ वर्षांच्या मुलीला फैजकडून मारहाण, रक्तस्त्रावाने ओढवला मृत्यु!


हिमाचल प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच सहा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. धर्मशाला, सुजानारपूर, कुटलेहार, लाहौल स्पीती, गाग्रेट आणि बडसर विधानसभा जागांवर १ जून रोजी मतदान होणार आहे. भाजपने पोटनिवडणुकीसाठी आपली यादी जाहीर केली आहे.

पोटनिवडणुकीसाठी धर्मशाळेतून माजी आमदार सुधीर शर्मा, सुजानपूरमधून राजिंदर राणा, बडसरमधून इंद्रदत्त लखनपाल, लाहौल स्पीतीमधून रवी ठाकूर, गाग्रेटमधून चैतन्य शर्मा, कुल्लेहारमधून देवेंद्र भुट्टो यांना तिकीट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार होते. राज्यसभा निवडणुकीनंतर त्यांना अपात्र घोषित करण्यात आले होते. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.



Powered By Sangraha 9.0