ममतांच्या गुंडाराजला आव्हान! संदेशखलीत रेखा पात्रा विरुद्ध नुरुल शेख थेट लढत

25 Mar 2024 12:28:10
 rekha patra
 
नवी दिल्ली : भाजपने रविवारी, दि. २४ मार्च २०२४ बंगालमधील १९ उमेदवारांची यादी जाहीर केली. संदेशखली येथील रहिवासी असलेल्या बशीरहाटमधून भाजपने रेखा पात्रा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनीच सर्वप्रथम संदेशखलीमध्ये महिलांसोबत होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला होता.
 
रेखा पात्रा देखील संदेशखलीत शाहजहानच्या अत्याचाराला बळी पडल्या होत्या. त्यांनी आपल्यासोबत आणि संदेशखलीतील इतर महिलांसोबत झालेल्या अत्याचारविरुद्ध आवाज उठवला होता. पश्चिम बंगालच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशखलीतील पीडितांची भेट घेतली होती. यामध्ये रेखा पात्रा यांचा देखील समावेश होता.
 
हे वाचलंत का? -  अल्लाह-हू-अकबरचा नारा अन् अंदाधुंद गोळीबार...; रशियातील दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
 
रेखा पात्राच्या तक्रारीवरूनच संदेशखळीच्या आरोपींना अटक करण्यात आली. संदेशखलीतील स्थानिक नागरिकांनी रेखा पात्रा यांना उमेदवारी देण्याची विनंती केली होती. स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या इच्छेला मान देऊन भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी रेखा पात्रा यांना बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. याचं बशीरहाट लोकसभा मतदारसंघात संदेशखलीचा देखील समावेश होतो.
 
बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर संदेशखलीतील पीडित माता-भगिनींच्या पाठीशी उभे राहण्याची इच्छा असल्याचे रेखा पात्रा यांनी व्यक्त केली. त्यांना पुढे ठेवायचे आहे. रेखा यांना उमेदवारी दिल्याने संदेशखळीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पीडित महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे, असा दावा करण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  होळी साजरी केली म्हणून कट्टरपंथीयांकडून मारहाण!
 
पीडित महिलांच्या आंदोलनानंतर संदेशखली हे गाव संपूर्ण देशात चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. संदेशखली येथे तुणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान आणि त्याच्या दोन साथीदारांनी महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. सत्ताधारी पक्षाचा वरदहस्त लाभलेल्या या नेत्यांनी संदेशखली येथील महिलांच्या जमिनीसुद्धा हडपल्या होत्या. महिलांनी या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवल्यानंतर शेख शाहजहानला आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली.
 
 
Powered By Sangraha 9.0