मुंबई: वित्त पुरवठादाराची स्थानिक शाखा असलेल्या होम क्रेडिट इंडिया (HCIN)ने सेवा भारत या विना-नफा तत्त्वावर कार्यरत असलेल्या संस्थेच्या सहकार्याने आपल्या आर्थिक साक्षरता (फायनान्शियल लिटरसी) कार्यक्रमाची पुढील आवृत्ती 'सक्षम 2024' सुरू केली असून,या अंतर्गत लाभार्थी म्हणून सुमारे 20,000 वंचित महिला आणि मुलींना पैशाशी संबंधित प्रत्येक पैलू नीट समजवण्याचा प्रयत्न राहील.
सक्षम फायनान्शियल लिटरसी इनिशीएटीव्ह’चा मुख्य उद्देश वंचित महिला आणि मुलींना आर्थिक बाबींची मूलभूत समज उपलब्ध करून देण्याचा आहे. जेणेकरून त्यांना सक्षम आणि सुज्ञ आर्थिक निर्णय घेण्यासाठी तयार करता येईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला आणि मुली डिजिटल देय (पेमेंट) पर्याय आणि त्याच्याशी संबंधित जोखीम आणि रिवॉर्ड जाणून घेण्यास देखील सक्षम होणार आहेत.
यंदाच्या वर्षी मुख्यत्वे उत्तर भारत (दिल्ली-एनसीआर, उत्तराखंड, पंजाब आणि राजस्थान) आणि पूर्व भारत (बिहार) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या तब्बल 800 हून अधिक आर्थिक साक्षरता कार्यशाळांद्वारे सुमारे 20,000 महिलांना (महिला विद्यार्थी, गृहिणी,घरगुती मदतनीस आणि रोजंदारीवर काम करणारे घटक) शिक्षित करणे हे ‘सक्षम 2024’ चे उद्दिष्ट आहे. सक्षम’च्या वतीने घेण्यात येणाऱ्या आर्थिक साक्षरता कार्यक्रमात अंदाजपत्रक, बचत, पत पात्रता, गुंतवणूक नियोजन यासारख्या विषयांचा समावेश असेल.
या उपक्रमाबद्दल बोलताना, होम क्रेडिट इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर आशिष तिवारी म्हणाले, "होम क्रेडिट इंडियामध्ये, सामाजिक प्रगतीसाठी आर्थिक सक्षमीकरण हा मूलभूत घटक आहे. आमचा त्यावर विश्वास आहे. सक्षम’च्या माध्यमातून समाजात राहणाऱ्या वंचित महिला आणि मुलींना आवश्यक आर्थिक कौशल्यांसह सुसज्ज करण्याची आमची वचनबद्धता पूर्ण करणार आहोत. महिला आणि मुलींना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि आत्मविश्वासाने आर्थिक परिस्थिती हाताळण्यास सक्षम करते. आमच्या वचनबद्धतेला बळकटी देत, सेवा भारताच्या सहकार्याने आर्थिक साक्षरता उपक्रमाची पुढील आवृत्ती-सक्षम 2024 सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत. आमची भागीदारी ही सर्वांच्या दृष्टीने आर्थिक समावेशन (फायनान्शियल इंक्लूजन) आणि सुलभतेला चालना देण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे".
प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत बोलताना सेवा भारत’च्या प्रकल्प प्रमुख आणि उपाध्यक्ष अंकिता उप्रेती सिब्बल म्हणाल्या, "अल्प उत्पन्न असलेल्या आणि उपेक्षित समुदायांमध्ये महिलांना आर्थिक सेवा मिळवण्यात आणि मालमत्ता प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात लक्षणीय अडथळ्यांना सामोरे जावे लागते. होम क्रेडिट इंडियाच्या ‘सक्षम’सारख्या उपक्रमांद्वारे, वित्तीय प्रणालींना आत्मविश्वासाने हाताळण्याचे आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांसह महिलांना सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे.
आमच्या आर्थिक साक्षरता कार्यशाळा महिलांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास, बचतीच्या सवयी जोपासण्यास आणि गुंतवणुकीच्या संधी शोधण्यास सक्षम करण्यासाठी आधारस्तंभ म्हणून काम करतील हा ठाम विश्वास आम्हाला वाटतो. एखाद्या स्त्री’ची पार्श्वभूमी काहीही असो, तिने अशा पद्धतीचा समजूतदार आर्थिक अवलंब आयुष्यात केल्यास, अडथळे दूर सारून आणि खरे आर्थिक सक्षमीकरण साध्य करून एक सुरक्षित आर्थिक भविष्याला चालना द्यावी, हे आमचे उद्दिष्ट आहे".
फायनान्शियल लिटरसी म्हणजेच आर्थिक साक्षरता हा होम क्रेडिट इंडियाच्या प्राथमिक ईएसजी स्तंभांपैकी एक आहे; आणि एक जबाबदार ग्राहक कर्ज पुरवठादार म्हणून हा ब्रँड आपल्या विविध कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबलिटी (CSR) उपक्रमांद्वारे आर्थिक आणि डिजीटल साक्षरतेस प्रोत्साहन देऊन व्यापक समाजात जबाबदारीने रक्कम कर्जाऊ स्वरूपात घेण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहे.वंचित घटकांतील महिला आणि मुलींना आर्थिक साक्षरता उपलब्ध करून देण्यासाठी इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या (IDF) भागीदारीत सक्षमची पहिली आवृत्ती जुलै 2022 ते मार्च 2023 पर्यंत आयोजित करण्यात आली होती.
होम क्रेडिट इंडियाने त्यांच्या इन-हाऊस 'पैसे की पाठशाला' मायक्रोसाइट, ब्लॉग आणि सोशल मीडिया मोहिमांद्वारे 30 लाखांहून अधिक लोकांशी संवाद साधला आहे.