संघ स्वयंसेवकांनी पंचपरिवर्तनाचे उदाहरण बनले पाहिजे : सरसंघचालक

    02-Mar-2024
Total Views |

Mohanji Bhagwat
(Mohanji Bhagwat on Panchaparivartan)

पाटणा : "स्वयंसेवकांनी आपल्या दैनंदिन जीवनात सामाजिक सलोखा, कौटुंबिक भावना, पर्यावरणाप्रती संवेदनशीलता, स्वदेशीचा आग्रह आणि नागरी कर्तव्याची भावना पाळली पाहिजे.", असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी स्वयंसेवकांना पंचपरिवर्तनाचे उदाहरण बनण्यासाठी आवाहन केले आहे. पाटणाच्या विजय निकेतन येथे शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित प्रांतस्तरीय कार्यकर्त्यांच्या सभेला ते संबोधित करत होते.

सरसंघचालक यावेळी म्हणाले, "प्रार्थनास्थळ, सार्वजनिक पाणवठे आणि स्मशानभूमीवर प्रत्येकाचा समान हक्क आहे. आपला समाज एका कुटुंबासारखा आहे. ही कौटुंबिक भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. पाण्याचा गैरवापर आणि वृक्षांचे संरक्षण व संवर्धन याकडेही सर्वांनी लक्ष दिले पाहिजे.

पुढे ते म्हणाले, "स्वयंसेवकांनी ‘स्व’चा स्वाभिमान आणि स्वदेशी भावनेवर आधारित आपले जीवन उत्कृष्ट बनविण्याची योजना आखली पाहिजे. जेणेकरून समाजाला प्रेरणा मिळेल. एखाद्या देशाचा योग्य विकास तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तेथील नागरिकांमध्ये नागरी कर्तव्याची जाणीव असते आणि ते काटेकोरपणे पाळतात."