मोठी बातमी! १० टक्के मराठा आरक्षणासह पोलीस दलात पदभरती होणार
02 Mar 2024 12:10:12
मुंबई : वर्ष २०२२, २०२३ मध्ये रिक्त झालेली १०० टक्के पदे भरण्यासाठी निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे येत्या काळात १७ हजार ४७१ इतकी पोलीस भरती आणखी होणार. ही भरती १० टक्के मराठा आरक्षणासह होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. १ मार्च रोजी विधान परिषदेत दिली. त्याव्यतिरिक्त कारागृह विभागात २ हजार पदे भरली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानपरिषद नियम २५९ आणि २६० अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येती घटना गंभीरच आहे. याप्रकरणी त्यांच्या अंगरक्षकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी थांबणार नाही. लोकप्रतिनिधींना धमक्या देणारे फोन कॉल्स करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.