आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट २३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट ओटीटी वाहिनी गाजवायला येत आहे.
मुंबई : जम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. ‘आर्टिकल ३७०’ (Article 370) या चित्रपटात स्वातंत्र्यापासूनचा ७५ वर्षांचा इतिहास दाखवण्यात आला आहे. या (Article 370) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली असून जागतिक स्तरावर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटगृह गाजवल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.
हे वाचलंत का? - ‘आर्टिकल ३७०’चा ७५ वर्षांचा इतिहास!
‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. आता ओटीटी रिलिजसाठी चित्रपट सज्ज झाला असून १९ एप्रिल २०२४ पासून ‘आर्टिकल ३७०’ जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाने जगभरात १००.०६ कोटी आणि देशात ७३.५६ कोटी कमवाले आहे. अभिनेत्री यामी गौतम हिने सोशल मिडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, “ही लोकांची ताकद आणि प्रेम आहे’.
आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाची निर्मिती आदित्य धर आणि ज्योती देशपांडे यांनी मिळून केली आहे. तर चित्रपटात मुख्य भूमिकेत यामी गौतमसोबत, अभिनेत्री प्रियामणी, वैभव तत्ववादी, अरुण गोविल, किरण करमरकर दिसत आहेत.