घरात घुसून झाली होती भाजप नेत्याची हत्या! मोदींनी भावूक होत सांगितली आठवण

19 Mar 2024 17:40:29
Late BJP Leader V Ramesh Tamilnadu
 

 
नवी दिल्ली :    तामिळनाडूमध्ये घरात घुसून लेखा परीक्षक तथा भाजप नेत्याची हत्या करण्यात आली होती, लेखा परीक्षक रमेश यांची जुलै २०१३ रोजी सालेम येथे घरात घुसून हत्या करण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडू येथील प्रचार रॅलीत प्रदेश सरचिटणीस राहिलेल्या रमेश यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
 
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी दि. १९ मार्च रोजी तामिळनाडूतील सालेम येथे जाहीर सभेला संबोधित केले. ते म्हणाले, रमेश गे राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष के एन लक्ष्मणन यांचे निकटवर्तीय होते. तामिळनाडूमध्ये भाजपच्या विस्तारात रमेश यांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी आणीबाणीच्या काळात लढा दिल्याचेही पंतप्रधानांनी जाहीर सभेत सांगितले.
 
 
हे वाचलंत का? -   सिद्दिक कप्पनचे 'PFI'ला आदेश?, दिल्ली दंगलीत भाजप नेत्यांना मारण्याचा कट रचला!
 

रमेश यांच्या कार्याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. रमेश यांच्या हत्येनंतर त्याची आई दशकभर न्यायासाठी लढत राहिली. तसेच, सालेममध्ये आल्यानंतर रमेश यांची आठवण येणे स्वाभाविक असून पक्षासाठी रात्रंदिवस काम करणारा रमेश हा आमचा साथीदार, उत्तम प्रवक्ता होता. पण, त्याची हत्या झाली. आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.” या जाहीर सभेनंतर भाजपातील सर्व नेते, उपस्थितांनी रमेश यांना श्रद्धांजली वाहिली.
 

भाजप सरचिटणीस रमेश यांची जुलै २०१३ला झाली होती हत्या
 
जुलै २०१३ रोजी लेखा परीक्षक म्हणून कार्यरत असलेले नंतर भाजप पक्षात प्रवेश करत सक्रिय राजकारणात सहभागी झालेले रमेश यांची घरात घुसून हत्या करण्यात आली. भाजप प्रदेश सरचिटणीस ५४ वर्षीय व्ही. रमेश यांची मारवणेरी येथील घरी हत्या करण्यात आली. हत्येच्या दिवशी सबंध दिवस सामान्य लोक व पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटण्यात घालविल्यानंतर रात्री १० वाजता आपल्या घरी पोहोचल्यानंतर आधीच दबा धरून बसलेले मारेकरी यांनी त्यांच्या मानेवर वार कले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याआधी ‘हिंदू मुन्नानी’ संघटनेच्या वेल्लयप्पनची हत्या झाली होती.




Powered By Sangraha 9.0