मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पराभवाच्या मानसिकतेतूनच ईव्हीएम वरून गळा काढला आहे. रविवार, दि. १७ मार्च रोजी मुंबईत शिवतीर्थावर (छत्रपती शिवाजी महाराज मैदान) येथे काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा ६३ दिवसांनंतर शिवतिर्थावर समारोप झाला. यावेळी गांधी बोलत होते.
राहुल गांधी यांनी यावेळी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ईव्हीएमशिवाय नरेंद्र मोदी जिंकूच शकत नाही. या देशाच्या राजाचा आत्मा ईडी, सीबीआय आणि ईव्हीएममध्ये आहे. भाजपकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी सुरू झालेली आहे, ते इलेक्ट्रोल बाँडमध्ये ते दिसून आले आहे, असे ते म्हणाले.
या सभेला उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, आरजेडी नेते तेजस्वी यादव, आम आदमी पार्टी यांसह इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांची उपस्थिती होती.
भाजपच्या डोक्यात हवा गेली : ठाकरे
शिवाजी पार्क तुम्ही निवडले त्याबद्दल धन्यवाद देतो. भाजपा हा फुगा आहे. त्यामध्ये हवा भरण्याचे काम आम्हीच केले. पण त्यांच्याच डोक्यात हवा गेली आहे.- चारशे पार म्हणजे ही काही फर्निचरची लढाई आहे का, देशभरातील राज्यातून महत्त्वाचे नेते या ठिकाणी आले.
काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत हीच परिस्थिती आहे.- विरोधी पक्षाची बैठक आहे पण आम्ही हुकुमशाही विरोधात ही लढाई आहे. असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.- घटना बदलायची म्हणून ४०० पार भाजपला करायचे आहे. लढायलाच कोणी नाही असे रशियात झाले तशीच परिस्थिती भारतात तयार करण्याची सुरूवात झाली आहे.- देश वाचला तर धर्म आणि देश वाचला तर धर्म वाचेल, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.- कोणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही. हा शिवछत्रपतींचा राज्य आहे. इंडिया आघाडीचा 'आपकी बार, मोदी तडीपार' चा निर्धार आहे.
देशाची जनता आमच्यासोबत आहे, तुम्हाला तोडून मोडून आम्ही हरवू.......
राहुल गांधींचे महाराष्ट्रात स्वागत आहे. देशातील विविध राजनितीक दलाचे नेते या ठिकाणी आले आहेत. त्यांचा स्वागत करण्यासाठी आम्ही स्वागत आहे. - भारताची आजची स्थिती आहे त्यावर परिवर्तन करण्याची गरज आहे. आश्वासन देऊन लोकांना फसवले त्या लोकांना हटविण्यासाठी ही दुरुस्ती करण्यासाठी ही लढाई आहे.- शेतकरी, मजुर, महिला यांना आश्वासन दिले. जे लोक आश्वासन देतात पण पूर्ण करत नाही त्यांना हटविण्यासाठी ही लढाई आहे. - या शहरामध्ये १९४२ मध्ये महात्मा गांधी यांनी छोडो भारत नारा दिला देता होता, असे शरद पवार म्हणाले.
त्याच धर्तीवर छोडो भाजपाचा नारा दिला आहे........
देशभरातील परिस्थिती सांगत आहे की, एकत्र लढा की एकट्याने लढा व लढाई करावीच लागणार आहे. ईव्हीएम विरोधात आम्ही लढत आहोत. पण तपासणीचा विचार आला की निवडणूक आयोग गप्प बसतो. - या निवडणूकीपूर्वी निवडणूक आयोगाला घेराव घालावा. त्यासाठी सर्व लोकांनी लढाईची गरज आहे.- इलेक्ट्रोरोल बाँड आलेला आहे. प्रत्येक चॅनलवर अमित शहा यांचे विधान येत आहे की, काळे धने आम्ही येते आणले आहे. कंपनी नफा २०० कोटी आणि १३ कोटी रुपयात एका कंपनीने इलेक्टोरोल बाँड भाजपने कसे केले.- मोदी का परिवार असा प्रचार सुरू झाला आहे. मोदी आपल्या पत्नींना सोबत घेऊ राहावे, ही वैयक्तिक गोष्ट सांगतात. मग आरएसएस व भाजप मग सांस्कृतिक विचार का मांडतात?, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले.