'रेड सी ' होऊनही भारताच्या निर्यातीत लक्षणीय वाढ

16 Mar 2024 17:34:10


मुंबई: रेड सी प्रकरणामुळे (Red See Crisis) मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयात निर्यातीवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ( Crude) तेलाच्या पुरवठा कमी झाल्यानं किंमतीतही फरक पडला.याच धर्तीवर भारत सरकारच्या वाणिज्य विभागाचे नवीन आकडे समोर आले आहेत.
 
या आकडेवारीनुसार भारतातील निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.आर्थिक वर्ष २४ मधील फेब्रुवारीमध्ये निर्यात ११.८६ टक्क्यांवरून ४१.४ अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाली आहे. यामध्ये अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रोनिक, केमिकल्स, फार्मास्युटिकल, पेट्रोलियम या पदार्थात रेड सी हल्ल्यामुळे मागणी पुरवठ्यात अनिश्चिता आली होती.
 
वस्तूमधील आयातीत २०२४ मध्ये १२.१६ टक्क्याने वाढ होत ६० अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाली होती.आयात वाढल्याने फेब्रुवारी २३ मध्ये वित्तीय तूट (Fiscal Deficit) मध्ये १६.५७ अब्ज डॉलरची वाढ झाली होती.
 
याविषयी बोलताना, वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल म्हणाले,' फेब्रुवारी महिन्याने आमच्या सर्व अपेक्षा ओलांडल्या आहेत. मला खूप आशा आहे की जेव्हा आपले आर्थिक वर्ष मार्चमध्ये संपुष्टात होते तेव्हा आमची एकूण वस्तूंची निर्यात गेल्या वर्षीच्या विक्रमी निर्यातीपेक्षा जास्त असेल. याचे सर्व श्रेय आमचे निर्यातदार, व्यापारी समुदाय, व्यवसाय आणि उत्पादन युनिट यांना जाते,”
 
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारतातील निर्यातीत इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) बेसिसवर ६.८ % ने वाढ झाली होती.एप्रिल फेब्रुवारी २२-२३ च्या तुलनेतील ४०९.११ अब्ज डॉलर तुलनेत एप्रिल फेब्रुवारी २३-२४ मध्ये निर्यातीत तीन टक्क्याने घट होऊन निर्यात ३९४.९९ अब्ज डॉलरवर पोहोचली होती.
 
सुनिता बर्थवाल यांनी सांगितल्याप्रमाणे, WTO (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) ने भारतीय निर्यातीत ३.३ टक्क्यांची वाढ होती असे भाकीत केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0