मुंबई : वझे - केळकर महाविद्यालय, मुलुंड (पूर्व) येथे 'वॉटर नॉलेज सेंटर'चे उद्घाटन करण्यात आले आहे. दि. १४ मार्च २०२४ रोजी 'वॉटर नॉलेज सेंटर'चे उद्घाटन करण्यात आले. पाणी व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्याकरिता वझे-केळकर महाविद्यालयाकडून सदर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
जलवर्धिनी प्रतिष्ठान अंतर्गत पाणी व्यवस्थापनाबाबत विशेष पुढाकार घेत वॉरट नॉलेज सेंटर सुरू केले आहे. या नॉलेज सेंटरच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन व पाणी प्रश्नासंदर्भात माहिती मिळविता येणार आहे. तसेच, खुली चर्चा व सल्ला याबाबत प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी असेल. याची सुरूवात एप्रिल महिन्यापासून करण्यात येईल.
यावेळी जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त यु. एम. परांजपे, वझे-केळकर महाविद्यालय प्राचार्या प्रो. डॉ, प्रीता निलेश. महाविद्यालयाचे सेक्रेटरी डॉ. बी. बी. शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. वॉटर नॉलेज सेंटरच्या माध्यमातून पाणी प्रश्नाबाबत चर्चा करून सल्ला घेणे शक्य होणार आहे. वझे-केळकर महाविद्यालयाकडून स्तुत्य पुढाकार घेत पाणी व्यवस्थापनाकरिता विशेष प्रयत्न केले जात आहेत.