पालिकेच्या कार्यालयात महिलांसाठी कौशल्य विकास विभाग!

15 Mar 2024 17:34:25
Skill Development BMC



मुंबई :  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात महिलांसाठी कौशल्य विकास विभाग उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुंख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत 'आकांक्षित महिला सक्षमीकरण योजने'चा शुभारंभ देखील करण्यात आला आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्याचे कॅबिनेट मंत्री लोढा यांनी दि. ३१ मार्च २०२४ रोजी रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पूर्ण मुंबईमध्ये जिथे महापालिकेची कार्यालये आहेत त्या सर्व ठिकाणी महिलांसाठी कौशल्य विकास विभाग सुरु करण्याची घोषणा केली होती.




मंत्री लोढा म्हणाले, "बचतगटातील महिलांना यंत्रे, उत्पादने, किंवा निधी मिळतो पण त्यांना खरी गरज मार्केटिंगसाठी आवश्यक असलेल्या कौशल्याची आहे. आपण या महिलांना मार्केटिंगचे अथवा ब्रॅण्डिंगचे कौशल्य दिले तर त्या सक्षम होतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुचवले होते. याद्वारे महिन्यातून ३ दिवस महिला बचतगटांना मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंगचे प्रशिक्षण दिले जाईल त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा!", असेही पालकमंत्री लोढा म्हणाले.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि कौशल्य विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी हा विशेष कौशल्य विभाग सुरु करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शहरातील महिलांना कौशल्य विकासासाठी मोठी मदत होणार आहे. तसेच, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या विकास केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहनही महिलांना केले आहे.


 
Powered By Sangraha 9.0