"ठाकरेंचा प्रस्ताव अपरिपक्व आणि हास्यास्पद"- नितीन गडकरींनी साधला ठाकरेंवर निशाणा

13 Mar 2024 17:33:12

NITIN GADKARI

 

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, "नितीन गडकरींनी आमच्याकडे यावे. आम्ही त्यांना निवडून आणू" उद्धव ठाकरेंच्या याच प्रस्तावावर उत्तर देताना गडकरींनी ठाकरेंना चांगलेच फैलावर घेतले आहे.
 
मंगळवारी, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी द्वारका द्रुतगती मार्गाचा १९ किमी लांबीचा हरियाणा विभाग लोकांसाठी खुला करण्यासाठी आयोजित कार्यक्रमादरम्यान 'पीटीआय'शी बोलताना त्यांनी ठाकरेंच्या प्रस्तावावर भाष्य केले. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांची काळजी करण्याची गरज नाही. ठाकरे यांची सूचना अपरिपक्व आणि हास्यास्पद आहे. भाजपमध्ये उमेदवारांना तिकीट देण्याची व्यवस्था आहे.''
 
हे वाचलंत का?-  उत्तराखंडसाठी ऐतिहासिक दिवस! समान नागरी कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
 
नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीकडून प्रस्ताव देताना उद्धव ठाकरे म्हणालो होते की, "गडकरींनी 'महाराष्ट्राची क्षमता' दाखवून 'दिल्लीसमोर झुकण्याऐवजी' राजीनामा द्यावा. “आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्यांचा विजय निश्चित करू.” ठाकरेंच्या याचं प्रस्तावावर प्रश्न विचारा असता नितीन गडकरींनी भाजप ४०० हून अधिक जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.
 
भाजपने लोकसभा निवडणुकांच्या घोषणाआधीच १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या यादीत महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा समावेश नव्हता. यावरुन ठाकरेंनी भाजपवर गडकरींना डावल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते की, महाराष्ट्राची यादी घोषित होताच, त्यात पहिले नाव नितीन गडकरी यांचे असेल.
 
 
Powered By Sangraha 9.0