सनातनविरोधी वक्तव्य भोवलं; हिंदुद्वेषी 'स्टॅलिन'ला कोर्टात हजर राहण्याचा आदेश

13 Mar 2024 11:51:56
 stalin
 
पाटणा : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) मंत्री उदयनिधी स्टॅलिनला बिहारमधील अराह जिल्ह्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) न्यायालयाने सनातनवर केलेल्या टिप्पणीबद्दल समन्स बजावले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे कोर्टाने म्हटले आहे. स्टॅलिनला दि. १ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. न्यायालयाने याप्रकरणी भादंवि कलम २९८ अन्वये दखल घेऊन कार्यवाही सुरू केली आहे.
 
सप्टेंबर २०२३ मध्ये ‘सनातन उन्मुलन संमेलना’मध्ये बोलताना डीएमके मंत्री उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते, “काही गोष्टी आहेत ज्या आपण संपवल्या पाहिजेत आणि आपण फक्त निषेध करू शकत नाही. डास, डेंग्यू ताप, मलेरिया, कोरोना, या सर्व गोष्टी आहेत ज्यांना आपण विरोध करू शकत नाही, त्या आपणच संपवायला हव्यात. सनातनही असेच आहे. त्याला विरोध करण्याऐवजी तो संपवायला हवा कारण तो लोकांना विभागतो.”
 
हे वाचलंत का? -  कर्नाटकमध्ये 'रमजान'साठी शाळांच्या वेळेत बदल! नेटकऱ्यांनी काँग्रेसला घेतले फैलावर
 
स्टॅलिनच्या या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार अधिवक्ता धरणीधर पांडे यांनी दाखल केली होती. या प्रकरणी आयपीसीच्या कलम १२० (बी), १५३ (ए), १५३ (बी), २९५ (ए) आणि २९८ अन्वये तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणाची माहिती देताना तक्रारदार स्वत: म्हणाले की, “मी सनातन धर्माचा अनुयायी आहे आणि उदयनिधी स्टॅलिन यांनी दिलेल्या द्वेषपूर्ण भाषणामुळे मी व्यथित आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्या भाषणाने समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या या भाषणामुळे हिंदू धर्माच्या अनुयायांचा अपमान झाला आहे.
 
उदयनिधी यांच्या भाषणामुळे केवळ हिंदू धर्माच्या अनुयायांचाच अपमान होत नाही तर धार्मिक गटांमधील भेदभावालाही प्रोत्साहन दिल्याचा आरोप तक्रारदाराने आपल्या याचिकेत केला होता. त्यांनी भाषणात प्रक्षोभक भाषेचा वापर करून समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवले आणि वर्गांमध्ये तेढ निर्माण केली, त्यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण झाला. या याचिकेवर सुनावणी करताना मनोरंजन झा यांनी जामीन मिळविण्यासाठी उदयनिधीला वैयक्तिकरित्या किंवा त्यांच्या वकिलामार्फत हजर राहणे आवश्यक आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ एप्रिल रोजी होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0