मुंबई : 'प्रगत संगणन विकास केंद्र' अंतर्गत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. C-DAC मध्ये काम करणाऱ्यांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. 'प्रगत संगणन विकास केंद्र'मधील रिक्त पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार विविध रिक्त पदांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रगत संगणन विकास केंद्राबाबत अधिक तपशील -
प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC), ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची एक वैज्ञानिक संस्था आहे. सी-डॅकच्या माध्यमातून देशात उच्च दर्जाचे संशोधन आणि विकास (R&D) साठी एक संस्था म्हणून, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीमध्ये आघाडीवर आहे. सी-डॅक प्रगत व सक्षम तंत्रज्ञानामध्ये सतत क्षमता निर्माण करत असून नवनवीन शोध घेत त्या कौशल्याचा लाभ घेत आहेत.
पदाचे नाव -
सहाय्यक ( ०१ जागा ) (खुला)
कनिष्ठ सहाय्यक ( ०१ जागा ) (ओबीसी)
शैक्षणिक पात्रता -
मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर
सरकारी संस्थेतून कम्प्युटर सर्टिफिकेट बंधनकारक
अर्ज शुल्क -
उमेदवारांकडून ५०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल.
एससी, एसटी, पीडब्ल्यूडी उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट
भरतीकरिता होणाऱ्या परीक्षेसंदर्भात अभ्यासक्रम
लॉजिकल रिझनिंग - २५ गुण
जनरल नॉलेज - २५ गुण
इंग्लिश - २५ गुण
न्युमरिकल अॅबिलिटी - २५ गुण
डोमेन नॉलेज - ५० गुण
अधिसूचना सविस्तर वाचण्यासाठी www.cdac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १८ मार्च २०२४ असेल.
लेखी परीक्षेसंदर्भातील अपडेट्स उमेदवारास ई-मेलच्या माध्यमातून देण्यात येतील
जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा
'प्रगत संगणन विकास केंद्र'च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा
भरतीसंदर्भातील नवनवीन अपडेट्स जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा